झाडांना नका करू नष्ट, श्‍वास घेताना होईल कष्ट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

नागपूर - दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने पर्यावरणाची समस्याही गंभीर होत चालली आहे. "स्मार्ट सिटी'कडे शहराची वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत एकीकडे सिमेंटचे रस्ते बनविले जात असताना त्याचवेळी वृक्षतोडही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचे रक्षण करण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. झाडांची कत्तल थांबली नाही, तर भविष्यात श्‍वास घेणेही अवघड जाणार आहे, असा संदेश शालेय विद्यार्थ्यांनी सकाळ-एनआयईच्या वक्‍तृत्व स्पर्धेत दिला. 

मानेवाडा रोडवरील सिद्धेश्‍वर विद्यालयात बुधवारी "पर्यावरण' या विषयावर आयोजित वक्‍तृत्व स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परखड मत मांडून या गंभीर प्रश्‍नाकडे समाजाचे लक्ष वेधले. व्यासपीठावर मुख्याध्यापक मालती भेदे व पर्यवेक्षक सुनीता लांडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेते श्‍वेता गजभिये, सायली बोभाटे, ममता राजपूत व रक्षा सहारे यांना भेटवस्तू व प्रशस्तिपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत परीक्षक म्हणून वर्षा पाटील व भालचंद्र मारोडकर यांनी काम पाहिले. संचालन मंजूषा डोंगरवार यांनी केले. निवेदिता निचल यांनी आभार मानले. कार्यक्रमात गोविंदा ठाकरे, आशालता वाघ, वर्षा डोर्लीकर, गीता गारघाटे, कल्पना ठाकरे, सुनील येटरे, टिना तितरे, मनाबाई राठोड, रेणू दंतुले व जयश्री क्षीरसागर होते. 

आज दोन शाळांमध्ये स्पर्धा 
वक्‍तृत्व स्पर्धेतील मालिकेअंतर्गत उद्या, गुरुवारी हुडकेश्‍वर रोडवरील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये सकाळी नऊला "संस्कार आणि फॅशन' या विषयावर स्पर्धा होणार आहे. तर, नंदनवन येथील जवाहर गुरुकुल विद्यालयात दुपारी चारला "माझी शाळा कशी असावी' या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा होणार आहे. 

"सकाळ एनआयई'तर्फे आमच्या शाळेत प्रथमच एका ज्वलंत प्रश्‍नावर वक्‍तृत्व स्पर्धेचे आयोजन केले. यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांत पर्यावरणाबद्दल जनजागृती निर्माण होणार आहे. "सकाळ'ने अशा प्रकारचे आयोजन नियमितपणे करावे, अशी अपेक्षा व्यक्‍त करते. 
- मालती भेदे, मुख्याध्यापक 

पर्यावरणाचा विषय अतिशय गंभीर व चिंताजनक आहे. स्पर्धेनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे. सकाळ-एनआयईचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना संधी दिल्याबद्दल सकाळ परिवाराचे आभार मानते. 
- सुनीता लांडे, पर्यवेक्षक 

Web Title: Do not destroy the trees