डॉक्‍टरची कर्मचाऱ्यास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

रुग्णाच्या नातेवाइकाकडून डॉक्‍टरास होणारी मारहाण आता नवी नाही. मात्र, भिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. केवल कोरडे यांनी आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक विनय खुशाल गजभिये यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.  

नागपूर - रुग्णाच्या नातेवाइकाकडून डॉक्‍टरास होणारी मारहाण आता नवी नाही. मात्र, भिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. केवल कोरडे यांनी आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक विनय खुशाल गजभिये यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.  

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक युनियनने दोषी डॉक्‍टरावर कारवाईची मागणी केली आहे.

युनियनचे अध्यक्ष सुभाष पडोळे व कार्याध्यक्ष राहुल देशमुख यांनी सांगितले की, विनय गजभिये हे २०१५ पासून येथे कार्यरत आहे. ते कर्तव्यदक्ष कर्मचारी आहे. डॉ. कोरडे हे मे २०१८ मध्ये तिथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. तेव्हापासून कुठल्यातरी कारणावर त्यांच्याशी वाद घातला आहे. २० मे रोजी डॉ. कोरडे यांनी गजभिये यांना कक्षात बोलाविले. पल्स पोलिओ लसीकरण पर्यवेक्षण, आयूष प्रशिक्षणाचे मानधन या कामाचा मोबदला मला का दिला नाही, अशी विचारणा केली. असे विचारून गजभिये यांना शिवीगाळ करीत मारहाणही केली. त्याचा गजभियेंना जबर धक्का बसला आहे. त्यामुळे डॉ. कोरडेंना निलंबित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor hit staff in nagpur

टॅग्स