कुरणखेड आरोग्य वर्धिनी केंद्रात डॉक्टरांच्या दांड्या

kurankhed.jpg
kurankhed.jpg

कुरणखेड (जि. अकोला) : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत येत असलेल्या येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात डॉक्टरांकडून कर्तव्यावर दांड्या मारण्याचे प्रकार समोर येत आहे. परिणामी रुग्णांना बाहेर प्रतिक्षेत थांबावे लागत असल्याने रुग्णांकडून रोष व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. जगाला आणि देशाला सध्या कोरोना विषाणूची पार्श्‍वभूमी आहे.

विना तपासणी परतावे लागले नागरिकांना
बाहेरागावी शिक्षण, व्यवसायाकरीता असलेले गावात परत येत आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर रविवारी (ता.22) मुंबई, पुणे, नागपुर व गोंदिया येथून परतलेले नागरिक येथील केंद्रात तपासणीसाठी गेले होते. मात्र दरम्यान आरोग्य वर्धिनी केंद्रात कुणीही डॉक्टर उपलब्ध नसल्याने काहींना विना तपासणी परतावे लागले तर काहींना बराच वेळ प्रतिक्षेत थांबावे लागले. या केंद्रांतर्गत कुरणखेड, पातूर-नंदापूर, वनी रंभापूर, कानशिवणी, शिवनी, कुंभारी, कोळंबी ही 7 उपकेंद्र येतात. सुमारे 72 हजार नागरीकांच्या आरोग्याची जबाबदारीचे नियोजन येथून पाहिल्या जाते. येथेच जर आरोग्य विभागाचे लक्ष नसेल तर इतर ठिकाणांचे काय असा प्रश्‍न परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

डॉक्टरांकडून योग्य उत्तर मिळाले नाही
पुणे येथे नोकरीसाठी राहतो. कोरोनाची पार्श्‍वभूमी पाहता सुटी लागल्याने गावाकडे परतलो आहे. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता स्वताः तपासणीसाठी कुरणखेडच्या आरोग्य केंद्रात साडेदहा वाजता गेलो. दरम्यान कुणीही डॉक्टर येथे कर्तव्यावर नव्हते. डॉक्टर खुतेजा यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांनी योग्य उत्तर दिले नाही.
-आकाश सोनोने, कुरणखेड

तीन तासानंतर आले डॉक्टर
गत काही दिवसांपूर्वी मुंबई येथून परतलो. सर्दी, खोकला असल्याने तपासणीसाठी गेलो. कर्तव्यावर डॉक्टर नव्हते. त्यामुळे बरेच रुग्ण वापस गेले. तीन तासानंतर डॉक्टर परत आले.
-रंजित घोघरे, पैलपाडा

कुरणखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. पुनम वैद्य व डॉ. खुतेज बाहेर गावातील तपासणी करण्यासाठी गेले होते.
-डॉ. जगदीश बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी, अकोला 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com