esakal | जमावबंदी तरी व्यापारी ऐकेना; मग घडले असे...
sakal

बोलून बातमी शोधा

vashim bajar.jpg

फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने, दवाखाने व मेडिकलची दुकाने तेवढे उघडे आहेत. बाकीच्यांना अनिश्‍चित काळापर्यंत दुकाने बंद करण्यास व्यापाऱ्यांना येथील तहसीलदार किशोर बागडे यांनी लेखी आदेशाद्वारे सूचित केले होते. तसेच तालुक्यातील शेलुबाजार व मंगरुळपीर येथील आठवडी बाजारावर बंदी घातली असून, शनिवारी काही व्यापाऱ्यांनी बाजारात आपली दुकाने लावून व्यवसाय सुरू केला होता.

जमावबंदी तरी व्यापारी ऐकेना; मग घडले असे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंगरुळपीर (जि. वाशीम) : सध्या जगभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध लावला असून, जिल्हा प्रशासनाने तशा प्रकारचे कडक निर्देश दिले असूनही मंगरुळपीर येथील शनिवारी सकाळी आठवडी बाजारात काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने लावली होती. परंतु, नगर परिषद व पोलिस प्रशासनाने धडक कारवाई करून दुपारी 3 वाजता व्यापाऱ्यांची दुकाने उठविली. पोलिस व नगर परिषदेची कारवाई सुरू असताना व्यापाऱ्यांनी दुकाने सोडून सैरावैरा पळण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा- अबब...! रेती माफियांनी केला चक्क पोलिसांना चिरडून करण्याचा प्रयत्न

तहसीलदारांनी दिले निर्देश

कोरोना व्हायरसमुळे शहरातील पानठेले, चहाटपरी, हॉटेल, वाईनबार यासह इतरही दुकानांना नोटीस बजावून दुकाने बंद करण्यात आली आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने, दवाखाने व मेडिकलची दुकाने तेवढे उघडे आहेत. बाकीच्यांना अनिश्‍चित काळापर्यंत दुकाने बंद करण्यास व्यापाऱ्यांना येथील तहसीलदार किशोर बागडे यांनी लेखी आदेशाद्वारे सूचित केले होते. तसेच तालुक्यातील शेलुबाजार व मंगरुळपीर येथील आठवडी बाजारावर बंदी घातली असून, शनिवारी काही व्यापाऱ्यांनी बाजारात आपली दुकाने लावून व्यवसाय सुरू केला होता.

क्लिक करा- रिकाम्यांना येथे प्रवेश बंदी; वाचा कोणी घेतला हा निर्णय

जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने चालू

बाजार भरला म्हणून शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांची ही गर्दी वाढली होती. ही बाब येथील तहसीलदार किशोर बागडे यांना माहिती होताच त्यांनी तत्काळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी व ठाणेदार यांना बाजार पांगवीण्याचे आदेश दिले व संबंधित व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नगर परिषद व पोलिस प्रशासनाने आठवडी बाजाराकडे धाव घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिस आल्याचे पाहताच दुकानदार आपली दुकाने सोडून सैरावैरावैरा पळायला लागले त्यांना पाहून बाजारात आलेले नागरिकही पळून गेले आणि क्षणार्धात बाजारपेठ सामसूम झाली. प्रशासन आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत त्याप्रमाणे नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन तहसीलदारांनी केले.