डॉक्‍टर आज रुग्णालयात परतणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

नागपूर - इंडियन मेडिकल असोसिएशनचे संप मागे घेण्याची केलेली घोषणा आणि मार्डने दिलेल्या शपथपत्रामुळे मागील चार दिवसांपासून संपावर असलेले डॉक्‍टर उद्या शनिवारी सकाळी आठला मेयो आणि मेडिकलमध्ये परतणार आहेत. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. 

रुग्णांच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केल्यामुळे राज्यभरातील डॉक्‍टरांनी संपाचे हत्यार उपसले होते. न्यायालयाने भीती वाटत असेल, तर नोकरी सोडून द्या, असेही त्यांना बजावले होते. मात्र, सुरक्षेच्या हमीशिवाय कामावर परतणार नाही, अशी ताठर भूमिका डॉक्‍टरांनी घेतली होती. यास आयएमए यांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर खासगी डॉक्‍टरसुद्धा संपात सहभागी झोले होते. यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्र्यांनी आता बस झाले... अशा शब्दात निवासी डॉक्‍टरांना इशारा दिला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉक्‍टरांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या वाटाघाटीत शुक्रवारी रात्री संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी डॉक्‍टरांना आठ दिवसांत शासकीय इस्पितळांमध्ये सुरक्षारक्षक नेमले जातील, असे आश्‍वासन दिले आहे. संप मागे घेण्यात आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 

संपामुळे मेडिकल आणि मेयोमधील शस्त्रक्रिया ठप्प पडल्या होत्या. अनेक रुग्णांना आल्यापावली परत जावे लागत होते. अनेक गंभीर आजारी असलेल्या रुग्णांची हेळसांड होत होती. यामुळे संतापाची लाट निर्माण झाली होती. 

Web Title: Doctors strike back