कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

टेकाडी : पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा त्याच्याच घरापासून शंभर मीटर अंतरावर झुडपांमध्ये मृतदेह आढळून आला. कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी व डुकरांनी लचके तोडले आहेत. ही घटना टेकाडी नजीकच्या अशोकनगर येथे उघडकीस आली. 

टेकाडी : पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा त्याच्याच घरापासून शंभर मीटर अंतरावर झुडपांमध्ये मृतदेह आढळून आला. कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी व डुकरांनी लचके तोडले आहेत. ही घटना टेकाडी नजीकच्या अशोकनगर येथे उघडकीस आली. 

भूषण प्रल्हाद मनगटे (वय 24) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे कन्हान व टेकाडी परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या महितीनुसार, अशोकनगर येथे राहणारा भूषण गुरुवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. भूषणने कामानिमित्त मित्रांसोबत मुंबईला जात असल्याचे सांगितले होते. यामुळे त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली नाही. सोमवारी (ता. 3) अशोकनगरमधील काही मुले खेळत असताना त्यांचा चेंडू झुडपामध्ये गेला. चेंडू शोधण्यासाठी मुले झुडपामध्ये गेली. यावेळी त्यांना मृतदेह कुजलेल्या व छिन्नविच्छिन्न अवस्थेत दिसून आला. कुत्रे व डुकरे मृतदेहाचे लचके तोडत होते. भेदरलेल्या मुलांनी पळ काढून गोंधळ घातला. आसपासचे नागरिक जमा झाले व त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, भूषणचे आप्तेष्टही घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी तक्रार नोंदवून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. 

घातपाताचा संशय 
मृत भूषणच्या आप्तस्वकीयांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. उत्तरीय तपासणी अहवालानंतरच आत्महत्या, घातपात की अपघात याचा तिढा सुटेल. भूषणच्या मृतदेहानजीक डबा आणि त्याच्या पायातील चपला पडलेल्या होत्या. अंगावर कपडे घातलेले होते. घटनास्थळानजीक दररोज मृताचे वडील घरच्या बकऱ्या बांधायला जातात, तर सोबतच क्षेत्रातील इतर लोकही नजीकच्या शौचालयात जात असल्याने बेपत्ता भूषणचा मृतदेह त्यांना कसा काय दिसला नाही याचीही चर्चा होत आहे. 

Web Title: Dog bytes dead body