कॉपर सलूनच्या उभारणीत डॉन आंबेकरचा पैसा! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

संतोष आंबेकर व कॉपर सलूनचा मालक विवेकसिंह ठाकूर यांना बलात्कार व बलात्काराला सहकार्य करण्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. एका गुजरातच्या व्यापाऱ्याला पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात संतोष आंबेकरला अटक करण्यात आली.

नागपूर : उपराजधानीतील प्रसिद्ध "कॉपर सलून व स्पा'मध्ये कुख्यात गुंड संतोष आंबेकरचीच गुंतवणूक होती, अशी प्राथमिक माहिती गुन्हे शाखा पोलिसांना तपासादरम्यान निष्पन्न झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी कॉपरचा मालक विवेकसिंह ठाकूरचे आर्थिक व्यवहार तपासण्यास सुरुवात केली असल्याची माहिती विश्‍वसनीस पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आंबेकर व कॉपर सलूनचा मालक विवेकसिंह ठाकूर यांना बलात्कार व बलात्काराला सहकार्य करण्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. एका गुजरातच्या व्यापाऱ्याला पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात संतोष आंबेकरला अटक करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत त्याच्याविरुद्ध बारा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

हेही वाचा -  अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

 

आरोपी विवेकसिंह ठाकूर याचे आठ रस्ता चौकात कॉपर सलून नावाने पार्लर आहे. या पार्लरमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी विवेक ठाकूरने "फर्स्ट टाईम फ्री' अशी योजना राबवली. या योजनेच्या नावाखाली फोन करायचा. प्रथम मुलींना केस कापण्यापासून ते वेगवेगळ्या सुविधा नि:शुल्क द्यायचा. त्यानंतर अल्पवयीन मुलींना मेकअप किट किंवा आर्थिक मदतीच्या नावाखाली त्यांना जाळ्यात ओढायचा. यानंतर तो स्वत: अश्‍लील चाळे करायचा. एखादी मुलगी जाळ्यात अडकली की त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोग करायचा.

 

संबंधित बातमी - डॉन संतोष आंबेकरचा आणखी एक कारनामा

 

याप्रकरणी लकडगंज पोलिस ठाण्यात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. चौकशी करताना कॉपर सलूनमधील गुंतवणूक ही संतोष आंबेकरचीच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिस विवेकसिंह ठाकूर याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करीत असल्याची माहिती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don Ambaker's money in salon