डॉन आंबेकरचा आणखी एक कारनामा उघड

डॉन आंबेकरचा आणखी एक कारनामा उघड

नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याला गंडा घालण्यासह खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यात अटकेत असणारा कुख्यात डॉन संतोष आंबेकरचा नवा कारनामा उजेडात आला आहे. त्याने गुजरातच्याच अन्य एका व्यापाऱ्याला सव्वा कोटीचा गंडा घालून खंडणी उकळल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉन आंबेकरने मुंबईतील भूखंड खरेदी व्यवहारात गुजरातचे व्यापारी जिगरभाई पटेल यांना पाच कोटींचा गंडा घालून एक कोटीची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आंबेकर अटकेत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातच नवीन प्रकरण उघडकीस आले आहे. देसाई वॉर्ड गुजरातचे रहिवासी हेमंत पुरोहित यांचा प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय आहे. सोबतच कॉस्मो प्लॅस्टिक वेस्ट नावाची कंपनीही ते चालवितात. व्यवसाय विस्तारासाठी त्यांना भाड्याच्या गोदामाची गरज होती. जागेच्या शोधात असताना आंबेकरचा हस्तक राम ऊर्फ रमेश पाटील याच्यासोबत त्यांची भेट झाली. रमेशने महाराष्ट्रात कुठेही जागा मिळवून देण्याची शाश्‍वती देत आंबेकरसोबत भेट घालून दिली. आंबेकरने जागा मिळवून देण्याची ग्वाही देत वापी येथील बालाजी फर्मच्या नावाने 25 लाख जमा करण्यास सांगितले. पुरोहित यांनी पैसे देण्याची तयारी दर्शविल्यानंतर रमेशने फोन केला. "तुम्हाला नोटा बदलविण्याचे काम करायचे आहे काय? या कामात दोन हजारांच्या नोटा, एकूण 1 कोटी रुपये भरल्यास 500 रुपयांच्या नोटा दिल्या जातील. वर 1 लाखाचे कमिशनही दिले जाईल', असे आमिष दाखविले. त्यावर विश्‍वास ठेवत 1 कोटी बालाजी फर्ममध्ये भरले. त्यानंतर मात्र पैसे मिळाले नाही. पुरोहित यांनी पैशांसाठी फोन केला असता "बालाजी फर्म के पैसे भूल जाओ', असे ठणकावत जिवे मारण्याची धमकी दिली. 
दहाची अर्धी नोटही गेली 
पुरोहित यांनी गुजरातमध्ये 1 कोटी जमा केल्यानंतर त्यांना 44 एम 809681 क्रमांक असलेली दहाची अर्धी नोट देण्यात आली. ही नोट दाखवून नागपूरच्या बालाजी फर्ममधून पैसे मिळतील, अशी बतावणी करण्यात आली होती. 20 ऑगस्ट 2018 रोजी पुरोहित पैसे घेण्यासाठी नागपुरात आले. विमानतळावरच आंबेकर, रमेश आणि त्यांचा अन्य एक साथीदार तिथे भेटले. आंबेकरने पुरोहितजवळून अर्धी नोट घेतली आणि पैसे मिळून जातील. काळजी करू नका, असा सल्ला देऊन तिथूनच परत पाठवून दिले होते. हा घटनाक्रम नागपूर विमानतळावरील असल्याने पुरोहित यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आंबेकर, रमेश आणि अन्य एका साथीदाराविरुद्ध फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com