तीन पिस्तुलांसह "वॉंटेड' गुंड अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : शहरात निवडणुकीची धामधूम असताना गुन्हे शाखेने "वॉंटेड' गुंडाला अटक करून पिस्तूल, देशी कट्टा व जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात शस्त्रे कुठून आणली, याचा पोलिस शोध घेत आहेत. फिरोज ऊर्फ हाजी खान मोहम्मद जाबिर (35, रा. बोरियापुरा, मोमिनपुरा) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजने फेब्रुवारीत डॉक्‍टरच्या घरी पत्र पाठवून मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिली व 50 लाखांची खंडणी मागितली होती. तेव्हापासून पोलिस त्याच्यावर नजर ठेवून होते. निवडणुकीच्या तोंडावर तो शहरात शस्त्रविक्री करीत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे, उपनिरीक्षक राजकुमार त्रिपाठी, मयूर चौरसिया, शंकर शुक्‍ला, राजेश टेनगुरिया, प्रमोदसिंह ठाकूर, सुरेंद्र पांडे, रवींद्र गावंडे, नरेंद्र ठाकूर, पंकज लांडे, प्रवीण रोडे, हर्षल पोटमासे, सागर ठाकरे, रोहित काळे, कुणाल मसराम, योगेश सेलुकर आणि देवीप्रसाद दुबे यांनी सापळा रचून 28 सप्टेंबरच्या रात्री 10.32 वाजताच्या सुमारास सापळा रचून बजाजनगर परिसराततील कमल बिजनेस प्लाझा परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता दोन पिस्तुले, देशीकट्टा व जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: don arrested