कुख्यात "गधा'चे छाटले मुंडके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

कुख्यात "गधा'चे छाटले मुंडके
खापरखेडा (नागपूर) : नजीकच्या चनकापूर येथे कुख्यात गुन्हेगार अशोक ऊर्फ गधा हरिदयाल पासवान (वय 28, रा. चनकापूर) याचे तलवारीने मुंडके छाटून धडापासून वेगळे करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याच्या अवयवांचे तुकडे तुकडेसुद्धा केले. ही थरारक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. धडापासून त्याचे मुंडके सुमारे एक किलोमीटर अंतरावरून पोलिसांनी ताब्यात घेतले.

कुख्यात "गधा'चे छाटले मुंडके
खापरखेडा (नागपूर) : नजीकच्या चनकापूर येथे कुख्यात गुन्हेगार अशोक ऊर्फ गधा हरिदयाल पासवान (वय 28, रा. चनकापूर) याचे तलवारीने मुंडके छाटून धडापासून वेगळे करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याच्या अवयवांचे तुकडे तुकडेसुद्धा केले. ही थरारक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. धडापासून त्याचे मुंडके सुमारे एक किलोमीटर अंतरावरून पोलिसांनी ताब्यात घेतले.
मित्रांनीच जुन्या वैनमस्यातून गधाचा खून केला असल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत गधा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर लूटमार, चोरी यांसारखे विविध गुन्हे दाखल आहेत. सोमवारी पंकज वर्मा यांच्या घरी नामकरण कार्यक्रमात गधा याच्यासह त्याचे मित्र रोहित सूर्यवंशी, सूरज ऊर्फ बारीक वरणकर, गुल्लू उर्फ आशीष वर्मा (तिघेही रा. चनकापूर) हजर होते. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्याचे मित्र रोहित, सूरज व गुल्लू यांनी गधाला घराबाहेर बोलावून घेतले. तेव्हापासून गधा घरी परत आला नाही.
मंगळवारी पहाटे चनकापूर हनुमान मंदिर परिसरातील लक्ष्मीनारायण ऊर्फ मुच्छी सूर्यवंशी यास पहाटे 5 वाजताच्या सुमारास रोहित सूर्यवंशी, सूरज वरणकर व आशीष वर्मा हे हनुमान मंदिराच्या मागून मुख्य रस्त्याकडे येताना दिसले. विचारणा केल्यावर रोहितने गधाचा गेम केला व शिर लाल दुपट्ट्यात असल्याचे सांगितले. गधा याचे शिर बघून मुच्छी घाबरला. त्याने लगेच खापरखेडा पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळावर मृताचे धड आढळून आले. तर वेकोलि वसाहतीत राहणारा रणजित कुरील याने गधाचे शिर त्याच्या घराजवळ पडले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी गधा याचे धड व शिर ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. मृताचा भाऊ अभय याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रोहित, गुल्लू, सुरजवर गुन्हा नोंद केला आहे. आरोपी फरार आहेत.
मुच्छीसोबत घातला होता वाद
हनुमान मंदिर जवळ झोपडपट्टीत सोमवारी दुपारी 3 वाजता मृत गधा तलवार घेऊन गेला असल्याची चर्चा आहे. यावेळी मृत गधाने मुच्छीसोबत वाद घातला होता. त्यावेळी सूरज व त्याची आईसुद्धा हजर होती. सूरजच्या आईलासुद्धा मृत गधाने शिवीगाळ केली होती.
शरीराची केली चाळणी
मृत गधाचा खून करताना त्याच्या शरीरावर तलवारीचे असंख्य घाव करण्यात आले. त्याचा हात व अन्य अवयव कापण्यात आले. यामुळे त्याच्या शरीराची चाळणी झाली होती. घटनास्थळावर पोलिसांना तलवारीची तुटलेली मूठ आढळून आली आहे.

Web Title: don murder news