कुख्यात गुंडाचा दगडाने ठेचून खून

file photo
file photo

नागपूर : तीन भावंडांनी कुख्यात गुंड अंकित रामप्रसन्न तिवारी (21, रा. राजीवनगर) याचा गेम करीत त्याची दादागिरी संपवल्याची घटना गिट्टीखदान परिसरात गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली. हत्याकांडामुळे पुन्हा एकदा गॅंगवॉर भडकण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
सुनील ईश्‍वर डहरवाल (21, रा. खडगाव रोड) व राहुल सीताराम डहरवाल (19, रा. बालाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक आहे. सर्व आरोपी एकमेकांचे चुलतभाऊ आहेत. अंकितविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची टोळी असून, वस्तीतील दुकानदारांकडून खंडणी, वसुली आणि चंदा मागण्यासाठी दादागिरी करायचा. अंकित हा राहुल, सुनील व विधिसंघर्षग्रस्त बालकाला दारूसाठी त्रास देत होता.
अनेकदा अंकितने राहुलची दुचाकी हिसकावली होती. नेहमी शिवीगाळ व मारहाण करीत होता. मंगळवारी त्याने सुनीलची दुचाकी हिसकावली व नुकसानही केले होते. त्याने जाब विचारला असता मारहाणही केली होती. रात्रीही त्याने राहुलला दारू पाजण्यासाठी धमकावले व दुचाकी हिसकावली. त्यामुळे तिन्ही भावंडांनी अंकितचा "गेम' करण्याचा प्लान केला. संधी मिळताच अंकितचा खून केला.  
असा रचला कट
तिन्ही आरोपी अंकितला हिंगणा एमआयडीसी परिसरातील बारमध्ये घेऊन गेले. त्याला खूप दारू पाजली. त्यानंतर दोन दुचाकींनी त्याला वाडी-दाभा मार्गे गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवीन काटोल नाक्‍याच्या पुढे फेटरीच्या पूर्वी जंगलाच्या परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी रॉडने डोक्‍यावर वार करून नंतर दगडाने ठेचून खून केला.
आरोपी स्वतः ठाण्यात हजर
अंकितचा खून करून तिघेही आरोपी दुचाकी घेऊन परत एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोहोचले व घटनेची माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांना कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह शवचिच्छेदनासाठी पाठवला. गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. त्यांना सायंकाळी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com