कुख्यात डॉन संतोष आंबेकरला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

नागपूर : गुजरातच्या एका व्यापाऱ्याची पाच कोटींनी फसवणूक केल्यानंतर पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात डॉन संतोष आंबेकरला गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे. ही कारवाई आज सायंकाळी करण्यात आली. जिगर परेशभाई पटेल असे तक्रारदार कारखानदाराचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिगर पटेल यांचा गुजरातमधील खेडा येथे कारखाना आहे. एका मध्यस्थामार्फत पटेल यांची आंबेकर यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी पटेल यांनी कंपनीसाठी मुंबईत जागा खरेदी करण्याची बोलणी केली होती. त्यावर आंबेकरने पटेल यांना मुंबई येथे जागा मिळवून देतो, अशी बतावणी केली होती. जून 2018 मध्ये रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे त्यांची बैठक झाली होती. या बैठकीत पटेल, संतोष आणि त्याचे साथीदार हजर होते. ठरल्याप्रमाणे पटेल यांनी संतोषला पाच कोटी रुपये दिले होते. मात्र, संतोषने त्यांना जागा मिळवून दिली नव्हती. त्यानंतर पटेल यांनी पैसे परत मागितले असता संतोषने पैसे परत केले नाहीत. उलट त्यांना दमदाटी करीत पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: don santosh ambekar arrested