युवतीवर अत्याचार झाल्याच्या चर्चेला उधाण; सावळी परिसरात जादूटोण्याचा संशय, पोलिसांची चौकशी सुरू

राज इंगळे  
Sunday, 27 September 2020

परतवाडा ते अंजनगाव मार्गावरील सावळी गावाच्या मंदिर परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका मांत्रिकाच्या साह्याने युवतीवर अतिप्रसंग झाल्याची जोरदार चर्चा शनिवारी सकाळपासून शहरात ऐकला मिळत होती. विशेष म्हणजे, या चर्चेची दखल परतवाडा पोलिसांनीसुद्धा घेतली.

अचलपूर (जि. अमरावती) : परतवाडा ते अंजनगाव मार्गावरील सावळी परिसरातील मंदिरात युवतीवर अत्याचार झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पोलिसांनीसुद्धा या चर्चेची चौकशी केली. त्यामुळे खरोखरच मंदिरात युवतीवर अत्याचार झाला काय? याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

परतवाडा ते अंजनगाव मार्गावरील सावळी गावाच्या मंदिर परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका मांत्रिकाच्या साह्याने युवतीवर अतिप्रसंग झाल्याची जोरदार चर्चा शनिवारी सकाळपासून शहरात ऐकला मिळत होती. विशेष म्हणजे, या चर्चेची दखल परतवाडा पोलिसांनीसुद्धा घेतली.

नाव, वय आणि धर्मामध्ये बदल करायचा आहे? चिंता करू नका; आता आले पर्यावरणपूरक ऑनलाइन 'राजपत्र'!

 तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणाची चौकशी केली. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना कोणत्याही प्रकारचे पुरावे हाती लागले नाहीत. त्यामुळे खरोखरच युवतीवर अत्याचार झाला की निव्वळ अफवा आहे, हे लवकरच पोलिस चौकशीत उघड होईल.

असे फुटले बिंग

पैशांचा पाऊस पाडतो म्हणून एका युवतीला आणण्यात आले. त्यासाठी विधी करण्याकरिता युवतीला खोलीत नेण्यात आले. मात्र लगेचच युवती ओरडत बाहेर आली अन्‌ बाहेर येऊन सोबत असलेल्या महिलेला घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे सोबतच्या महिलेने त्या मांत्रिकाला चोप दिला.

याठिकाणी मोठा वाद निर्माण झाला असल्याची माहिती आहे. परिणामी होणारा विधी अर्धावरच सोडून सर्वजण घटनास्थळावरून मुलीसह पसार झाले. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. सध्या या घटनेचा तपास परतवाडा पोलिस करीत आहेत.

लघुपटाच्या नायिकेनेच लावला निर्मात्याला लाखोंचा चुना

शुक्रवारी सायंकाळी काही नागरिकांकडून मंदिर परिसरात अनुचित प्रकार घडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस त्याठिकाणी पोहोचले. मात्र काही आढळून आले नाही तसेच अद्यापपर्यंत कोणीही तक्रार दिली नाही. मिळालेल्या माहितीच्या आधारावर चौकशी सुरू आहे. त्यामुळे नेमका त्याठिकाणी काय प्रकार घडला, याबाबत चौकशीअंती सविस्तर सांगण्यात येईल.
-सदानंद मानकर
ठाणेदार, परतवाडा.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doubt of black magic for misbehave with girl