प्रेयसीवर संशय; चाकू, दगडाने खून करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

murder
murderesakal

यवतमाळ : दुसरीकडे प्रेम असल्याच्या संशयातून (Doubt on the beloved) तरुणीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर चेहऱ्यावर दगडाने प्रहार करून खून केला. यानंतर तरुणाने स्वत:च्या हाताची नस व गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (ता. तीन) येथील लोहारा एमआयडीसी परिसरात घडली. आस्था सुरेश तुंबडे (वय १९, रा. उमरसरा) असे मृत तरुणीचे तर शुभम अशोक बाकल (वय २४, रा. सिंघानियानगर, यवतमाळ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

लोहारा एमआयडीसी परिसरात रस्त्यावर तरुण रक्तबंबाळ अवस्थेत नागरिकांना दिसला. नागरिकांनी लगेच धाव घेऊन विचारपूस केली असता त्याने तरुणीचा खून केल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच पोलिस पथकासह घटनास्थळ गाठले. गंभीर जखमी असलेल्या तरुणाला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

murder
युक्रेनमधून मृतदेह आणण्यावरून भाजप आमदार म्हणाले, एका मृतदेहाऐवजी...

तरुणीची शोधमोहीम राबविली असता तिचाही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तिच्या पोटावर व गळ्यावर चाकूने हल्ला (murder) केलेला होता. इतकेच नव्हेतर चेहऱ्यावर गोट्याने प्रहार करून खून केल्याचे समोर आले. उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी, ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा नोंद झाला नव्हता. पुढील तपास ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

शिकवणी वर्गही घ्यायची

आस्था ही शहरातील महाविद्यालयात बी. कॉम प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून पहिली ते चौथीपर्यंतचे शिकवणी वर्गही घेत होती. गुरुवारी (ता. तीन) शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी दुचाकीने घरून निघाली होती. मात्र, काही वेळातच तिचा खून (murder) करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com