प्रवीण भोटकर यांना डॉ.आंबेडकर रत्न ग्लोबल चेंज मेकर्स पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

अकोला : महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य प्रवीण भोटकर यांना संयुक्त राष्ट्र संघ आणि फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात डॉ. आंबेडकर रत्न ग्लोबल चेंजमेकर्स अॅवॉर्ड या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

अकोला : महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य प्रवीण भोटकर यांना संयुक्त राष्ट्र संघ आणि फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात डॉ. आंबेडकर रत्न ग्लोबल चेंजमेकर्स अॅवॉर्ड या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

संयुक्त राष्ट्र संघाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या महान कर्तुत्वाला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याला प्रा. स्टॅन क्याचनोवस्की,अमेरिकेतील मिस अरब मा.इनाज आलावाम, मा.ऍडम ट्रेजर,मा.स्टीव्हन कियोन,मा.मयूर सक्सेना, मा.ओम भागेल, मा.दिलीप म्हस्के चेअरमन फाउंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉन तसेच जगभरातील राजदूत आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रवीण भोटकर यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, रुगणसेवा, आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन, कंत्राटी कामगारांना न्याय, परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, विविध आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन, गोर गरीब रुग्णांना मदत या कार्याची दखल घेऊन प्रवीण भोटकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने सुद्धा प्रवीण भोटकर याना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1913 रोजी न्यूयॉर्क शहरात येऊन कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेऊन जगाला हेवा वाटावा अशी भारतीय राज्यघटना निर्माण करून वंचितांना न्याय दिला अश्या या ऐतिहासिक शहरात येऊन बाबासाहेबांच्या नावाने पुरस्कार मिळणे आणि त्यांच्या जीवनावर बोलण्याची संधी मिळाल्याने धन्य झाल्याची भावना प्रवीण भोटकर यांनी आमच्या प्रतिनिधींसोबत बोलताना व्यक्त केली.

प्रवीण भोटकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Web Title: Dr Ambedkar Ratna Global Change Makers Award for Praveen Bhotkar