डॉ. जगदीश बारसागडे यांचे संयुक्‍त राष्ट्रसंघात नामांकन

डॉ. जगदीश बारसागडे
डॉ. जगदीश बारसागडे

देवरी (गोंदिया) : तालुक्‍याच्या बोरगाव बाजार येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा तसेच एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलचे माजी प्राचार्य डॉ. जगदीश बारसागडे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघाने युनायटेड नेशन ग्लोबल टॅलेन्ट पूलमध्ये त्यांना रोस्टर क्रमांक यूएनजीटीपी/यूएनव्ही-1478686 प्राप्त झाला आहे.
डॉ. जगदीश बारसागडे यांनी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, माता-पालक उद्‌बोधन शिबिरे, समाजजागृती मेळावे, शिक्षणापासून वंचित मुलींना शिक्षणासाठी विशेष कार्य, शंभर टक्‍के लोकसहभागातून डिजिटल शाळा, असे एक नव्हे, तर अनेक उपक्रम राबविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक स्तरावर संयुक्‍त राष्ट्रसंघाने घेतली. युनायटेड नेशन ग्लोबल टॅलेन्ट पूलमध्ये त्यांना रोस्टर क्रमांक यूएनजीटीपी/यूएनव्ही -1478686 प्राप्त झाला आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघात त्यांचे नामांकन झाल्याबद्दल लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडात्मक उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. याबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com