डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, गुटखा, भेसळमुक्त महाराष्ट्र आपले स्वप्न

minister rajendra shingne.jpg
minister rajendra shingne.jpg

बुलडाणा : गुटख्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. गुटख्याच्या आहारी गेल्यामुळे अनेक आजारांना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून आपण गुटखा बंदीची कठोर अंमलबजावणी तसेच, भेसळमुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने वेळप्रसंगी कठोर पाऊले उचलणार मागेपुढे पाहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज (ता. 25) पत्रकार परिषदेत केले.

बुलडाणा जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 2019- 20 च्या 233 कोटींच्या जिल्हा नियोजनापैकी 42.73 टक्के खर्च झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मध्यंतरीच्या काळात दोन निवडणुका असल्यामुळे सुमारे चार महिन्याचा कालावधी हा आचारसंहितेत गेल्यामुळे निधी खर्च होऊ शकला नाही. मात्र, आगामी काळात अधिकाअधिक निधी खर्च कसा करता येईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येईल.

रिक्त पदे भरण्याची मागणी
चालू 2020- 21 साठी 216.36 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये आणखी 50 कोटींचा निधी वाढवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गुटखा बंदी संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, आमच्या विभागाकडे सुमारे 350 ते 400 रिक्त पदे आहेत. त्यामुळे परिणामकारक पद्धतीने कारवाई करणे शक्य होत नाही. यासाठी अर्थमंत्री व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

भरारी पथक तयार करण्याच्या सूचना
गुटखा बंदीसाठी भरारी पथक तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय, खाद्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्हा पत्रकार भवनाच्या उर्वरित बांधकाम निधी संदर्भात त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com