Dr. Shripad Joshi : स्वातंत्र्यानंतरही समतेची कविता लिहावी लागणे हे देशाचे दुर्दैव; डॉ. श्रीपाद जोशी

पुस्तक प्रकाशन समारंभ थाटात
Dr Shripad Joshi statement misfortune to write poem about equality even after independence
Dr Shripad Joshi statement misfortune to write poem about equality even after independence sakal

गोंदिया : भारतीय स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून, कवी नामदेव ढसाळांनी विविध कवितेतून समतेची मांडणी केली. परंतु, भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असं घडलं नाही. परिणामी, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळापर्यंत अजूनही साहित्यिकांना समतेच्या कविता लिहाव्या लागतात, हे देशाचं फार मोठे दुर्दैव आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली.

डॉ. जोशी हे गोंदियातील संथागार हॉल येथे आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. कवी नंदू वानखडे यांनी लिहिलेली २ पुस्तके ज्यामध्ये कविता संग्रह ‘अंतर्मनातली आंदोलने’ आणि कथा संग्रह ‘ज्याला नाही माय’ या पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. युवराज गंगाराम होते. मंचावर डॉ. सुरेश खोब्रागडे, प्रा. प्रमोद अनेराव आणि कवी नंदू वानखडे उपस्थित होते.

डॉ. जोशी म्हणाले की, विद्रोहाचे पाणी पेटले आहे. राज्यघटना सांभाळून ठेवणे ही मूठभर लोकांची जबाबदारी नाही, शोषणाचे स्वभाव आणि चरित्र यात बदल झालेला नाही असे सांगून नंदूची कविता विचारांची चेतना निर्माण करते. यावेळी युवराज गंगाराम यांनी सांगितले की, कवी नंदू आपल्या कवितेत जीवनाची चर्चा करतो असे सांगून त्यांच्या कवितेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे टोकदार शस्त्र आहे, असे ते म्हणाले.

एकाबाजूला एकाधिकारशाही आणि फॅसीझम डोके वर काढत असताना धर्मनिरपेक्ष कवी हातबांधून कसा काय शांत राहू शकतो, असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ. खोब्रागडे म्हणाले की, कवी सामान्य माणूस नाही. कवीला अन्यायग्रस्तांचे नेतृत्व करावं लागतं. कवी हा योद्धा असून त्याला विविध पातळ्यांवर युद्ध करावा लागतो. कवीला नव्या पिढीचेही भविष्य लिहिण्याची गरज आहे.

प्रा. अनेराव यांनी कवी आणि कथा यामधील फरकाचे स्पष्टीकरण सांगितले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. सविता बेदरकर, मिलिंद रंगारी यांनी कविता संग्रहातील कविता वाचून दाखविल्या. दरम्यान, कवी माणिक गेडाम, कालिदास सूर्यवंशी आदी साहित्यिकांना कथासंग्रह आणि कविता संग्रह भेट देण्यात आले.

दरम्यान, जुही वानखडे यांनी रमाई हा एकपात्री प्रयोग या प्रसंगी सादर केला. अत्यंत उत्कृष्ट अशा या कार्यक्रमाची उपस्थितांनी तोंड भरून स्तुती केली. यावेळी चित्र प्रदर्शनाचेही पाहुण्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक कवी नंदू वानखडे यांनी, तर संचालन जुही नंदू वानखडे यांनी केले. आभार गौतम गजभिये यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com