नालेसफाई अपूर्णच

राजेश प्रायकर
शुक्रवार, 1 जून 2018

नागपूर - पावसाळा तोंडावर असून, शहरातील नाल्यांची सफाई अपूर्ण आहे. गाजावाजा करीत सुरू केलेली नदी स्वच्छताही अर्धवट आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाल्यास शहराच्या अनेक भागात तलाव साचण्याची शक्‍यता बळावली आहे. परिणामी नागपूरकरांना ठिकठिकाणी साचणाऱ्या तलावांतून मार्ग काढण्याची सर्कस करावी लागणार आहे.

हवामान खात्याने पाऊस यंदा लवकर दाखल होणार असल्याची शक्‍यता वर्तविली होती. शहरात पाऊस कोसळल्याने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसून येत आहे. मात्र, महापालिकेने हवामान खात्याचा अंदाज गांभीर्याने घेतलेला नाही. हवामान खात्याच्या सूचनेनुसार महापालिकेने नाले सफाई, नदी स्वच्छता व ड्रेनेज लाइन स्वच्छतेची कामे लवकर सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. परिणामी पावसाळा तोंडावर असतानाही शहरातील नाल्यांची सफाई अद्यापही अपूर्ण आहे.

दहापैकी लक्ष्मीनगर, धरमपेठ, नेहरूनगर, लकडगंज व मंगळवारी या पाच झोनमधील नाले सफाईची कामे अद्याप शिल्लक असल्याचे सूत्राने नमूद केले. शहरातील नद्या स्वच्छतेचाही बोजवारा उडाला आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे नदी स्वच्छतेकडे लक्ष नसल्याचेच चित्र आहे. शहरातील नद्यातील गाळ वाहून नेण्यासाठी अद्यापही टिप्परची सुविधा नाही, तर स्वच्छतेसाठी पोकलॅंडही नसल्याचे एकाने नमूद केले. शहरातील ड्रेनेज लाइनची स्वच्छतेची कामे आता सुरू केली आहे.

शहरातील नाले - 236
स्वच्छ झालेले नाले - 220
नालेसफाई न झालेले झोन - 5

नदी स्वच्छतेचा बोजवारा
पारडी भागात अद्यापही नदी स्वच्छतेसाठी पोकलॅंड मिळाले नसल्याचे नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. एवढेच नव्हे, अंबाझरी ते पंचशील टॉकीज व जगत रेस्टॉरंटच्या बाजूला नदीची स्वच्छता झाली नाही.

Web Title: dranage cleaning