स्वप्नांचा पाठलाग करणारा कलावंत कैलास 

केवल जीवनतारे 
रविवार, 19 मे 2019

मराठी सिनेसृष्टीत नवनवीन दिग्दर्शक व कलावंतांची गर्दी आहे. नेता बनण्यापेक्षा अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात चेहरा नसल्याने संधी मिळणार नाही, हे कैलासने ओळखले होते. परंतु, त्याच्याजवळ आवाजाचे धन होते. याच बळावर जालना जिल्ह्यातील "चांदई' या लहानशा गावातून त्याने अभिनयाचा पाठलाग गेला. पथनाट्यापासून रंगमंचावरील चार भिंतीआडच्या "एकांकिका' सहजपणे पेलवल्यानंतर लोकनाट्यातून खऱ्या अर्थाने कैलास घडला. 

नागपूर - गरीब असल्याचे दुःख कवटाळत न बसता उराशी बाळगलेल्या स्वप्नाचा जो पाठलाग करतो, तो आयुष्यात यशस्वी होतो. बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविणारा सुंदर आवाजाचा धनी असलेला अभिनेता म्हणजे कैलास वाघमारे! मुंबईत या होतकरू अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. नागपुरात "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाच्या निमित्ताने झालेल्या भेटीत कैलाससोबत संवाद साधला असता त्याच्यात अभिनेता, दिर्ग्दशकही लपलेला असल्याचे दिसून आले. 

मराठी सिनेसृष्टीत नवनवीन दिग्दर्शक व कलावंतांची गर्दी आहे. नेता बनण्यापेक्षा अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात चेहरा नसल्याने संधी मिळणार नाही, हे कैलासने ओळखले होते. परंतु, त्याच्याजवळ आवाजाचे धन होते. याच बळावर जालना जिल्ह्यातील "चांदई' या लहानशा गावातून त्याने अभिनयाचा पाठलाग गेला. पथनाट्यापासून रंगमंचावरील चार भिंतीआडच्या "एकांकिका' सहजपणे पेलवल्यानंतर लोकनाट्यातून खऱ्या अर्थाने कैलास घडला. 

एम. ए. मराठी पर्यंतचे शिक्षण घेऊन त्याने मुंबईत नाट्यशास्त्राचे दोन वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. यावेळी वामन केंद्रे यांच्यासारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाले. लहान-लहान नाटकातून भूमिका मिळाल्या. सुमित्रा भावे व सुनील सुखटणकर यांच्याशी भेट झाली आणि "शाळा' मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. या संधीचे सोने कैलासने केले. दिग्दर्शक संदेश भंडारे यांच्या "महादू' या चित्रपटात कैलासने तुकारामची भूमिका साकारली. याशिवाय आजच्या तरुण पिढीचे भावविश्‍व मांडणारा मराठी चित्रपट "ड्राय डे'तील त्याच्या भूमिकेचे कौतुक झाले. "हाफ तिकीट', "हिरवी' अशा अनेक चित्रपटांत कैलासला संधी मिळाली. भीमनगर मोहल्ला या नाटकात अभिनयाची चुणूक त्याने दाखवून दिली. 

अनिल कपूरची दाद 
राजकुमार तांगडे व संभाजी भगत यांच्या "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकातील कैलासच्या आवाजाने खऱ्या अर्थाने रसिकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरला. पांडुरंग जाधव यांच्या दिग्दर्शनातील "मनातल्या उन्हात' सिनेमात कैलास अभिनेता म्हणून पाय रोवण्यात यशस्वी झाला. "मनातल्या उन्हात' या सिनेमाच्या म्युझिक लॉंचवेळी खुद्द अनिल कपूर यांनी कैलासच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले होते. ती कौतुकाची थाप कैलास वाघमारेला पुढील वाटचालीकडे झेपावत आहे. 

पत्नी मीनाक्षीच्या साथीने आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करीत आहे. सहचारिणी आहे तशीच ती कलेतही सोबतीला आहे. शिवाजी अंडरग्राउंड... या नाट्यापासून तर "हिरवी'पर्यंत तिने साथ दिली आहे. यामुळेच कान्स महोत्सवापासून तर अनेक चित्रपट महोत्सवात माझ्या "शॉर्ट फिल्म'ला पसंती मिळाली. 
- कैलास वाघमारे,  अभिनेता, मुंबई. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dream chaser artist Kailash waghmare