दाखविलेले स्वप्न पूर्ण करणार

रेशीमबाग ः स्टॉलवर बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या कपाळावरून हात फिरविताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर.
रेशीमबाग ः स्टॉलवर बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या कपाळावरून हात फिरविताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर.

दाखविलेले स्वप्न पूर्ण करणार
नागपूर : मी जे बोलतो, त्यावर अनेकजण विश्‍वासच ठेवत नाही. परंतु, स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. जे स्वप्न दाखवणार ते पूर्ण करण्याची ताकदही आहे, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री व ऍग्रोव्हिजनचे प्रवर्तक नितीन गडकरी यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.
रेशीमबाग येथे ऍग्रोव्हिजन या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शेतीतील कचऱ्यावर संशोधन करून त्यातून उत्पन्नाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आमचेही "व्हिजन' आहे. शेतीवरील खर्च कमी होऊन, जास्तीत जास्त उत्पादन कसे होईल, हेच स्वप्न आहे. ते पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. ज्या दिवशी एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही, त्या दिवशी आमचे "मिशन' पूर्ण होईल, असेही गडकरी यांनी नमूद केले.
आता शेतकऱ्यांच्याच शेतात सौरऊर्जा निर्माण करण्याची राज्य सरकारची योजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळेल. मलेशिया, ब्राझील येथून तेलबियांची आयात करावी लागत होती. कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या पुढाकारामुळे आयात बंद केली, परिणामी सोयाबीनची किंमत 3,400 रुपये झाली. लवकरच डाळींसाठीही शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल, असे ते म्हणाले. नागपुरात मदर डेअरी सुरू केली. सध्या येथे अडीच लाख लिटर दूध गोळा होते. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावर दुधाची मागणी कमी असल्याने येथेच उत्पादन तयार केले जाईल. मात्र, या डेअरीच्या विस्तारासाठी कृषिमंत्री सहकार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत गडकरींनी 25 ते 30 लाख लिटरपर्यंत क्षमता वाढवून त्यापासून विविध पदार्थ तयार करून येथेच विकता येईल, असे सांगितले.
विदर्भ ऊस लागवडीत मागे होता. मात्र, दहा वर्षांत विदर्भातील शेतकरीही एकरी 80 ते शंभर टनापर्यंत ऊस तयार करीत आहे. त्यामुळे शहरात कुणीही नोकरी मागण्यासाठी येत नसून उत्तर प्रदेशनेही याचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केले. उसाच्या मळीपासून इथेनॉल तयार होते. देशात दोन लाख कोटींचे इथेनॉल तयार होऊ शकते. याबाबत आता अनेक राज्ये गंभीर होत आहे. यापुढे शेतावरील सर्व ट्रॅक्‍टर बायोसीएनजीवर चालविले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांची डिझेलच्या तुलनेत दरवर्षी 50 हजारांची बचत होईल. बांबूपासून बायोफ्यूएल तयार करणे शक्‍य असून, त्यावर विमान उडविले जाऊ शकते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे 30 हजार कोटींची बचत होईल, असेही ते म्हणाले. त्यांनी उसाच्या दराने बांबू खरेदीची तयारी असल्याचीही घोषणा केली.
योगी आदित्यनाथ यांना बांबूचे वस्त्र
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बांबूपासून तयार भगवे वस्त्र दिली. गडकरी यांनी भाषणातून विदर्भातील गडचिरोली भागात बांबू लागवडीला मोठे यश मिळत असल्याचे नमूद करीत पीक पद्धतीत बदल करण्याची गरज व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com