पोलिस अधिकाऱ्यांच्या चालकाची आत्महत्या! स्वत:वरच झाडून घेतली गोळी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षकांच्या वाहन चालकाने रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 7) सकाळी सात वाजताच्या सुमारास पोलिस संकुल परिसरात घडली.

गडचिरोली : सगळे जगच कोरोनाच्या संकटात आहे. पोलिस दलावर या संकटाचा विशेष ताण आहे. स्वत:चा जीव धोक्‍यात घालून पोलिस विभाग लॉकडाऊनच्या काळात आपले कर्तव्य बजावित आहेत. पोलिस दलातील नोकरी नेहमीच ताणाची असते. जनतेच्या रक्षणाचे कार्य करीत असलेल्या पोलिस दलातील व्यक्‍तीनेच आत्महत्या केल्यामुळे सगळीकडे आश्‍चर्य व्यक्‍त केल जात आहे.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षकांच्या वाहन चालकाने रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 7) सकाळी सात वाजताच्या सुमारास पोलिस संकुल परिसरात घडली. मदन गौरकार (47) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव असून ते 1992 मध्ये गडचिरोली जिल्हा पोलिस दलात रुजू झाले होते.

त्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय, याचा पोलिस शोध घेत आहेत. मदन गौरकार हे गेल्या काही दिवसापासून अप्पर पोलिस अधीक्षक श्री. ढाले यांच्याकडे चालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे श्री. ढाले यांच्या बंगल्यावर गेले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी अचानक रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली .

हेही वाचा - नगरपालिकेच्या नियोजनाचा उडाला फज्जा, संततधार पावसाने तुंबले शहर

त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलिस दलातील दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या तर मुलचेरा येथील एका पोलिस निरिक्षकाने पत्नीची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driver in police department commit Suicide