पैसेवारी उत्तम दुष्काळ कसा जाहीर करणार?

Drought
Drought

नागपूर - दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात असलेल्या राज्य आणि केंद्राच्या निकषात मोठा फरक आहे. राज्याच्या निकषाच्या आधारे जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत सर्वच तालुक्‍याची पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली. मात्र, केंद्राच्या निकषाच्या आधारे जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांत दुष्काळीस्थिती दर्शविण्यात आली. त्यामुळे राज्याचे निकष दुष्काळीस्थितीला पांघरून घालणारी असल्याची टीका होत आहे. 

राज्याच्या निकषाच्या आधारे नुकतचे नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली होती. याचा अर्थ पीक परिस्थिती उत्तम आहे. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील उत्पादनची स्थिती केंद्राच्या निकषानुसार तपासण्यात आली. यात प्रभावशाली निकषानुसार काटोल, नरखेड व कळमेशवर या तीन तालुक्‍यांची पीक परिस्थिती वाईट असल्याचे समोर आले.

यात तीनही तालुक्‍यात ७५ टक्‍केपेक्षा कमी पाऊस झाला. येथील कापूस पीक कमी दर्जाच्या असून सोयाबीनही कमी प्रतीची असल्याचे समोर आले. पहिल्या आणि दुसऱ्या कळमध्ये उत्पादनाची  तूट असल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार या तीनही तालुक्‍यांतील १० टक्के गावांमध्ये रॅन्डमली सर्वेक्षण करण्यात येणार आहे. येथील प्रमुख पीक असलेल्या आणि २५ टक्केपेक्षा जास्त पेरणी झालेल्या शेतात प्लॉट पाडून त्याची सर्वे होणार आहे. हे सर्वेक्षण तालुका आणि मंडळ स्तरावरील महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत करण्यात येणार आहे. 

राज्याचा पीक कापणी प्रयोग फसवा?
कृषी आयुक्त यांच्या उपस्थितीत नुकताच एका शेतात पीक कापणी प्रयोग राबविण्यात आला. त्याच हेक्‍टरी २० क्विंटल सोयाबीन होणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन होणार असल्याचे दर्शविण्यात आले. प्रत्यक्षात कमी पावसामुळे सोयाबीनचा दाणा पाहिजे त्या प्रमाणात भरला नसून ती हलक्‍या दर्जाची असल्याचे सांगण्यात येते. कापसालाही मार लागल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्याचा पीक कापणी प्रयोग फसवा  असल्याचे दिसते.

संपूर्ण जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त जाहीर करावा. 
- मनोहर कुंभारे, विरोधी पक्ष नेते, जि.प.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com