'सून रहा है ना तू...रो रहे है हम'; मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या व्यथा

श्रीधर ढगे
मंगळवार, 27 मार्च 2018

सून रहा है ना तू...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गाणी गात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो संदर्भ देत पाणी टंचाई ग्रस्त चिंचोली गांवातील नागरिकांच्या व्यथा मांडताना करताना 'सून रहा है ना तू...रो रहे है हम...अशी भावना व्यक्त करावीशी वाटते.
- सुनील पाटील, ग्रामस्थ चिंचोली

खामगाव (बुलडाणा) : उन्हाळ्याच्या सुरवातीलाच राज्यातील अनेक गावात पाणी टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या लोकांच्या डोळयात पाणी येत आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावात पाणीबाणी निर्माण झालेली असून शेगाव तालुक्यातील चिंचोली गावात तर भीषण पाणी टंचाई आहे. प्रशासनाने उपाययोजना म्हणून या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला. जवळपास ५ हजार लोकवस्ती असलेल्या गावाची तहान भागविण्यासाठी एक टँकर सुरू करण्यात आले. तेही दोन ते तीन दिवसाआड गावात येते.

टँकर आले की लोक पाण्यासाठी अक्षरशः तुटून पडतात. हंडाभर पाण्यासाठी भांडणे होतात. कुणाला पाणी मिळते तर कुणाला नाही.त्यामुळे लोकांच्या घश्याची कोरड कायम आहे. ही अवस्था मोलमजुरी करणाऱ्या लोकांची काही ज्यांच्याकडे पैसा आहे ते विकतचे पाणी घेतात. गरीब नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.

सून रहा है ना तू...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गाणी गात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो संदर्भ देत पाणी टंचाई ग्रस्त चिंचोली गांवातील नागरिकांच्या व्यथा मांडताना करताना 'सून रहा है ना तू...रो रहे है हम...अशी भावना व्यक्त करावीशी वाटते.
- सुनील पाटील, ग्रामस्थ चिंचोली

Web Title: drought situation in Buldhana