अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली; टॅंकर नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. जवळपास 450 गावांत ही टंचाई तीव्र आहे. अद्याप एकाही गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. येणाऱ्या काही दिवसांत मात्र टॅंकरची आवश्‍यकता भासणार आहे.

यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा जवळपास 17 कोटींचा असून; त्यात विविध उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे आराखडा तयार करताना टंचाईची तीव्रता नसलेल्या अनेक गावांना आता झळा बसू लागल्या आहेत. या गावांचा आराखड्यात नव्याने समावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

स्थानिक स्तरावर संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आलेत. दरवर्षी चिखलदरा तालुक्‍यातील 13 ते 15 गावांना तीव्र पाणीटंचाईमुळे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यंदा मार्चमध्येच कडाक्‍याचे उन्ह असल्याने येणाऱ्या काही दिवसांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जाऊ शकतो; मात्र सध्या तशी स्थिती नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टंचाईनिर्मूलन आराखड्यात नवीन विंधनविहिरी, विशेष नळयोजना घेणे, बंद हातपंपांची दुरुस्ती, नवीन हातपंपांना मंजुरी, विहिरींचे खोलीकरण, विहिरींमधील गाळ काढणे आदी उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला.

चिखलदऱ्याकडे विशेष लक्ष 
दरवर्षी जिल्ह्यात केवळ चिखलदरा तालुक्‍यातील काही गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदाही खडीमल, बिब्बा, हिराबंबई, ढोमणी फाटा, जारिदा यांसह अन्य काही गावांना टॅंकर लागू शकतो.

Web Title: Drought situation worsening in Amravati district