झिंगलेली तरुणी पोहोचली ठाण्यात, सांगितले हे कारण...

drunken amravati girl
drunken amravati girl
Updated on

अमरावती : अतिउत्साही युवक, युवतींपैकी काहींनी नववर्षाचे स्वागत उघड्यावर तर काहींनी बंद घरात, गल्लीबोळात मद्यप्राशन करून आनंद साजरा केला. परंतु बंद घरातील आनंद आधी रस्त्यावर व नंतर पोलिस ठाण्यातदेखील पोहोचला. त्यात एका युवतीचा असलेला समावेश धक्कादायक असा होता.

शहरातील बिच्छूटेकडी परिसरात काही शिक्षित युवती भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांनी काही मित्रांच्या उपस्थितीत परिसरात छोटेखानी न्यू ईअर पार्टी केल्याची माहिती आहे. त्यापैकी एका युवतीने मद्यप्राशन केले होते. ती खोलीच्या बाहेर आली. त्यामुळे तिला इतर काही मुलांनी इशारे केल्याची माहिती आहे. त्यामुळे चिडलेल्या काही युवकांनी तिला इशारे करणा-यांबाबत विचारणा केली. परंतु ती काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती.

न्यू ईअर स्वागत करताना बिच्छूटेकडीत हाणामारी
त्यानंतर काही उत्साही युवकांनी कुणाला तरी त्याच ठिकाणी मारहाण केली. प्रकरण तापत असल्याचे बघून पोलिस निरीक्षकांचे वाहन त्या भागात पोहोचले. धुमाकूळ घालणा-यांचा शोध घेतला. परंतु धुमाकूळ घालणारे कुणीच बिच्छूटेकडी परिसरात आढळले नाही, असे अधिका-यांनी सांगितले. मात्र उच्च शिक्षित युवतीला पोलिसांनी तक्रार नोंदविण्याच्या दृष्टीने ठाण्यात बोलविले. तिची वैद्यकीय तपासणी केली असता, मद्यप्राशन केल्याचे आढळले. परंतु तिच्यासोबत असभ्य वर्तन कींवा कुणी मारहाण केल्याची तक्रार नोंदविण्यास तिने स्पष्ट नकार दिला.

पोलिसांकडून तिच्या भविष्याचा विचार
तिने मद्यप्राशन केले असल्यामुळे रात्रीच तिची वैद्यकीय तपासणी केली. परंतु त्या युवतीच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून पोलिसांनी अधिक सक्ती दाखविली नाही, हेसुद्धा तेवढेच खरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com