
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : तालुक्यातील पातुर्डा येथे लाखो रुपये खर्च करून उभारलेली इमारत कंत्राटदारांच्या उदासीनमुळे अर्धवट असल्याने कुठल्याही उपयोगात येत नाही आहे. इमारतीला तडे गेले असून, लाईट फिटिंग व इतर काही कामे अपूर्णच ठेवण्यात आली आहेत. या सर्कल मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यही याबाबात काही बोलत नसल्याने विविध चर्चांना पेव फुटले आहे.
शिकस्त इमारतीमध्येच पशुंचे उपचार
जिल्हा परिषदच्या निधीतून 19 लाख रुपये किंमतीची पशु वैद्यकीय श्रेणी 1 ची इमारत उभारण्याचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. अजूनही सदर काम कंत्राटदाराकडून पूर्ण होताना दिसत नाही. लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही आजरोजी जुन्या शिकस्त इमारतीमध्ये पशुंचे उपचार केले जात आहेत. सदर इमारत पूर्णत्वाचा कालावधी किती या बाबत साधी माहितीही डॉक्टर देऊ शकले नाहीत. यामध्ये कंत्राटदाराला अभय कुणाचे या बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आरोग्याच्या बाबतीत पशुंनाही शासनस्तरावर तितकेच महत्त्वाचे मानले जाते.
क्लिक करा - कोरोनाची धडकी; कार्यक्रमांना कात्री
तीन वर्षापासून आहे काम बंद
पशु सेवेच्या नावाखाली कितीतरी कोटी वर्षाला खर्चाची तरतूद केली जाते. पातुर्डा येथील जुनी शिकस्त इमारत पाहता या ठिकाणी नवी इमारतीसाठी निधी देण्यात आला. निधी देताना राज्यात युतीची सत्ता होती. या भागाचे जि.प.सदस्य, प.स. सदस्य व प.स. सभापतीही याच सर्कलचे होते. तरीही इमारतीचे काम पूर्ण करून उपयोगात आणली गेली नाही. आज जि.प आणि प. स. सदस्य भाजपचे तर सत्ता महाविकास आघाडीची असताना कुणीच काहीही बोलायला तयार नाही. तीन वर्षे होत आहेत या इमारतीचे काम बंद आहे. अपूर्ण काम असल्याने इमारतीचे हस्तांतरणही बाकी असल्याची माहिती आहे. सदर इमारतीचे उर्वरित काम कंत्राटदाराकडून करून घेण्याची जबाबदारी गाव पुढारी घेतील का? हा प्रश्नही या निमित्ताने महत्त्वाचा मानला जात आहे.
कामे पूर्ण करून देण्याबाबत कंत्राटदाराला सांगितले
इमारतमधील लाईन फिटिंग, पाण्याची टाकी बसविणे व अजून काही छोटे-मोठे कामे बाकी आहेत. ती कामे पूर्ण करून देण्याबाबत कंत्राटदाराला सांगितले आहे. त्यासाठी कंत्राटदाराचा अंतिम हप्ता थांबवुन ठेवण्यात आला आहे.
-उदय बुर्जे, अभियंता जि.प. जळगाव जामोद
जुन्या इमारतीमध्येच कारभार सुरू
इमारतीच्या कामाबाबत मला काही माहिती नाही. इमारतीला काही ठिकाणी तडे गेले आहेत. इंस्टिमेटनुसार काम पूर्ण झाल्यावर इमारत ताब्यात घेतली जाणार. तोपर्यंत जुन्या इमारतमध्ये कारभार सुरू आहे.
-डॉ. अजीस पटेल, पशु वैद्यकीय अधिकारी पातुर्डा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.