आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे दोन गर्भवती मातांचा मृत्यू

नंदकिशोर वैरागडे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कोरची तालुक्यातील गरोदर मातेचा मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करीत असताना व सिकलसेलग्रस्त आजारावर शासन सर्वपरीने सिकलसेलग्रस्त रुग्णांना मदत करीत असताना सिकलसेलग्रस्त दोन गर्भवती महिलांचा जिल्हा आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे एकाच महिन्यात मृत्यू झाला आहे.
 

गडचिरोली- कोरची तालुक्यातील गरोदर मातेचा मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करीत असताना व सिकलसेलग्रस्त आजारावर शासन सर्वपरीने सिकलसेलग्रस्त रुग्णांना मदत करीत असताना सिकलसेलग्रस्त दोन गर्भवती महिलांचा जिल्हा आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे एकाच महिन्यात मृत्यू झाला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र बोटे कसा अंतर्गत येत असलेल्या रामसायटोला येथील बारोबाई रमेश दररो या गर्भवती मातेचा 18 ऑगस्टला कोरची ग्रामीण रुग्णालय येथे तर नवेझरी येथील रेखा रमेश बोगा या गर्भवतीने मातीचा पंधरा दिवसाअगोदर गडचिरोली येथील जिल्हा महिला रुग्णालय येथे निधन झाले. ह्या दोन्ही गरोदर माता सिकलसेल या दुर्गम आजाराने आजारी होत्या. या दोन्ही गर्भवती मातेचे आरोग्य विभागात ग्रीन कार्ड तयार करून यांची आरोग्य तपासणी नेहमीत केली जात होती. त्यामुळे आरोग्य विभागाला सिकलसेल असलेल्या रुग्णाला रक्ताची कमी होते हे माहित असताना या गरोदर मातांना रक्ताचा पुरवठा जिल्हा सामान्य रुग्णालयात केल्या नाही त्यामुळे या दोन महिलांचा गरोदरपणामध्ये मृत्यू झाल्याची बाप समोर आलेली आहे.

नवेजरी येथील महिलेला ग्रामीण रुग्णालय कोरची यांनी अधिक उपचारासाठी गडचिरोली सामान्य रुग्णालयात पाठवले असताना तिला रक्ताची आवश्यकता असताना दोन दिवस ग्रामीण रुग्णालय गडचिरोली ठेवल्यानंतर गडचिरोली रक्तपेढीमध्ये  रक्त नाही म्हणून तिला चंद्रपूर रेफर करण्यात आले तिथेच तिचा मृत्यू झाला तर राम साठवला येथील गर्भवती मातेला आठ तारखेला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली रेकॉर्ड केल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला कसल्याही प्रकारचा औषधोपचार न करता केल्यामुळे व रक्त दिन न दिल्यामुळे ती हताश होऊन ब्रह्मपुर येथील रुग्णालयात जाऊन पाहिजे असलेला रक्त घेतले त्यानंतर ती गरोदर माता गावी आली जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये गरोदर मातेची होणारी हेळसांड पाहून ग्रामीण भागातील महिला दवाखान्यात जाण्यासाठी धजावत नाही पण ज्या आरोग्य यंत्रणेकडे ही जवाबदारी आहे ती यंत्रणा मात्र एखादा गरोदर मातेचा मृत्यू झाल्यास शासकीय उत्तर देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या व्हाट्सअप ग्रुप वरती मात्र रात्र जागून उत्तर शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करून आपली कातडी वाचवण्यासाठी गरोदर मातेच्या कुटुंबीयांना दोषी ठरवून त्यांच्याच मुळे त्यांचे निधन झाले हे दाखविण्यात मात्र आरोग्य विभाग तरबेज झालेला आहे.

Web Title: Due to negligence of health department dies two pregnant mothers