उन्हाचा फटका दुधाला! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

नागपूर - सुरेंद्रगड, टीव्ही टॉवर येथे राहणाऱ्या मंजुष चंदेलेचे हिस्लॉप महाविद्यालय चौकात डेली नीड्‌सचे दुकान आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत तो दूध, बिस्किट्‌स व चॉकलेट्‌स विकतो. मात्र, उन्हामुळेही सर्वसामान्यांप्रमाणेच तोही परेशान आहे. त्याला उन्हाचा त्रास तर होतोच; शिवाय दूध फाटत असल्यामुळे आर्थिक फटकादेखील बसतो. 

30 वर्षीय मंजुष सात-आठ वर्षांपासून या चौकात व्यवसाय करीत आहे. मुख्य व्यवसाय दूधविक्रीचा असल्यामुळे त्याचा दिवस पहाटेपासूनच सुरू होतो. उन्हाच्या दिवसांमध्ये सकाळी आणलेले दूध टिकवून ठेवण्यासाठी त्याला चांगलीच कसरत करावी लागते. दुधाचे पाकीट विकले न गेल्यास दिवसभर दुकान सुरू ठेवावे लागते. शिवाय दूध फाटल्यामुळे आर्थिक नुकसानही होते. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा उन्हाळा कडक असल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे त्याने सांगितले. 

मंजुषच्या परिवारात आई व दोन बहिणी आहेत. दिवसभराच्या मेहनतीनंतर बऱ्यापैकी कमाई होते. एकेकाळी हलाखीच्या स्थितीत जगणाऱ्या मंजुषची आता आर्थिक स्थितीही सुधारली आहे शिवाय तो भविष्यासाठी थोडेफार पैसेही जमा करतो आहे. 

Web Title: Due to summer harsh weather results on milk business