भर पावसात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बजावले कर्तव्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

अमरावती ः विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या बंगल्याजवळ एक मोठे झाड 11 केव्ही वीजवाहिनीवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. भर पावसात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत संबंधित ग्राहकांचा पर्यायी व्यवस्थेतून तात्पुरता वीजपुरवठा सुरळीत केला.

पडलेले झाड खूप मोठे असल्याने या झाडामुळे 11 केव्हीचा लोखंडी खांब हा पूर्णपणे जमिनीपर्यंत वाकला आहे. शिवाय झाडाच्या दबावामुळे या खांबावरील वीजवाहिन्याही तुटल्या. एक रोहीत्रही बाधित झाले. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र मळसणे व त्यांची टीम पावसाची तमा न बाळगता तातडीने कामाला लागली. पण कामाचे मोठे स्वरूप, संध्याकाळची वेळ आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाले नसले तरी परिसरातील ग्राहकांना पर्यायी वीजवाहिनीवर शिफ्ट करून त्यांचा वीजपुरवठा तात्पुरता सुरू करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During the monsoon, Mahavitaran employees performed their duties

टॅग्स