

Nagpur Mumbai Duronto Express Faces Stone Pelting Again AC Coach Window Glass Shattered Near Ajni Station
sakal
नागपूर : मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसवर सोमवारी (ता. २३) रात्री पुन्हा दगडफेक झाली. अजनी स्थानक ओलांडताच अज्ञात समाजकंटकांनी भिरकावलेला दगड थेट सेकंड एसी कोचच्या खिडकीवर आदळला. सुदैवाने खिडकीला दुहेरी सुरक्षा काच असल्याने प्रवासी थोडक्यात बचावले.