मेळघाटातील औषधीसाठा इमारत धूळखात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अमरावती : मेळघाटातील सेमाडोह येथे लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली औषधी साठवणूक केंद्राची इमारत आज धूळखात पडली आहे. सुविधांअभावी या इमारतीचा कुठलाही उपयोग होत नसल्याने आदिवासी बांधव मात्र त्रस्त झाले आहेत.

अमरावती : मेळघाटातील सेमाडोह येथे लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली औषधी साठवणूक केंद्राची इमारत आज धूळखात पडली आहे. सुविधांअभावी या इमारतीचा कुठलाही उपयोग होत नसल्याने आदिवासी बांधव मात्र त्रस्त झाले आहेत.
मेळघाटमधील आरोग्य सुविधांबाबत नेहमीच चर्चा होत असते. चालकांअभावी बंद असलेल्या रुग्णवाहिका, आरोग्य केंद्रात स्थायी डॉक्‍टर व कर्मचारी नसणे, अपुरा औषधी साठा या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत. सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात जवळपास 10 लाख रुपये खर्चून औषधी साठवणुकीसाठी इमारत बांधण्यात आली. मेळघाटातील दुर्गम भागात असलेल्या आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधीसाठ्यासाटी अमरावतीला यावे लागते. त्यासाठी वेळेचा तसेच पैशांचासुद्धा अपव्यय होतो. हीच बाब हेरून शासनाने सेमाडोह येथे औषधी साठवणुकीची व्यवस्था करून दिली. या ठिकाणाहून औषधीसाठा मेळघाटातील अन्य रुग्णालयांना सहजपणे केल्या जावू शकतो. मात्र, प्रशासकीय दुर्लक्षितपणामुळे ही इमारत आता कुचकामी ठरली आहे. विशेष म्हणजे या केंद्रासाठी फार्मासिस्ट तसेच अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्‍तीसुद्धा झाली आहे तरी ही इमारत सुरू करण्यात आलेली नाही.

ही इमारत बांधून जवळपास पाच वर्षे झाली आहे. कर्मचाऱ्यांची नियुक्तीसुद्धा झाली आहे. तरी याचा उपयोग घेतला जात नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असून आदिवासींना वेळेवर औषधोपचार कसा मिळेल हे पाहणे गरजचे आहे.
- ऍड. बंड्या साने.

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शासनाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी वाहन चालक मिळेनासे झाले. तसेच अनेक ठिकाणी टायर सुस्थितीत नसल्याने रुग्णवाहिका बंदच आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dust building in Melghat in the dust