पाच लाख रुपयांची ई-तिकिटे जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

अकोला - रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या आयआरसीटीसीचे अधिकृत तिकीट विक्री केंद्र म्हणून महापालिका चौकात असलेले राधे टूर्स आणि ट्रॅव्हल्सवर रेल्वे पोलिसांनी छापा घातला. यात पाच लाख रुपयांची ई-तिकिटे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (ता.13) रात्री उशिरादरम्यान करण्यात आली. 

राधे टुर्स आणि ट्रॅव्हल्सचे संचालक प्रकाश अग्रवाल अवैध मार्गाने तिकीट मिळवून त्याची वाढीव दरात विक्री करीत आहेत, अशी माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेल्वे पोलिस दलाचे वेरेश नगर आणि त्याच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरादरम्यान छापा घातला. यात पाच लाख नऊ हजार रुपयांची ई-तिकिटे अवैधपणे खरेदी केल्याचे आढळले. आरोपी एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-ticket worth Rs five lakh seized