साद्राबाडीत भूकंपाचे धक्के

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

धारणी (जि. अमरावती) : धारणीपासून 15 किलोमीटर अंतरावरील साद्राबाडी या गावात शुक्रवारी (ता. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही. नागरिकांत मात्र यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

साद्राबाडी गावातील नागरिकांना दुपारच्या सुमारास अचानक धक्के जाणवल्याने ही बाब लगेचच त्यांनी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली. उपविभागीय अधिकारी राहुल कर्डिले यांनी तहसीलदार व तलाठ्यांना त्यासरशी या गावात पाठविले. मात्र, सायंकाळपर्यंत अधिकृतरीत्या माहिती मिळू शकली नाही. तीन ते चार दिवसांपूर्वीही गावकऱ्यांना अशाच प्रकारचे धक्के जाणवले होते. जिल्हा प्रशासनाकडून मात्र हे धक्के नेमके कशाचे, याबाबत अधिक स्पष्टता करण्यात आली नाही.
साद्राबाडी या गावातील नागरिकांना धक्के जाणवल्याची माहिती मिळताच तहसीलदारांना त्या ठिकाणी पाठविले. मात्र, परिसरात भूकंपमापन यंत्र नसल्याचे पुढे आले. याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे.
- राहुल कर्डिले,
उपविभागीय अधिकारी, धारणी

Web Title: earthquake news