भूकंपसदृश धक्‍क्‍यांनी हादरले साद्राबाडी

प्रतीक मालवीय
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

धारणी (अमरावती) : तालुक्‍यातील साद्राबाडी गावाला गेल्या काही दिवसांपासून भूकंपसदृश धक्के जाणवत आहेत. मंगळवारी (ता. 21) पहाटे तीनच्या सुमारास सुमारे 25 ते 30 धक्के बसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. अनेकांनी रात्र अंगणातच काढली. यामुळे आरोग्य केंद्राच्या समोरील छताचा काही भाग पडला; तर काही कच्च्या घरांचेसुद्धा नुकसान झाले.
दरम्यान, आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धोकादायक स्थितीत असलेल्या घरांची पाहणी करून गावकऱ्यांना जुन्या इमारतीत न राहण्याचे आवाहन केले. येथील उपविभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांचे पथक मंगळवारपासून साद्राबाडीत तळ ठोकून आहे. त्यांनी जनतेला सतर्कतेचा इशारा दिला.

दोन वर्षांपूर्वीसुद्धा अशाच प्रकारे येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. या धक्‍क्‍यांमुळे गावकरी घाबरले असून अनेक कुटुंबे गाव सोडून निघून गेले. साद्राबाडी परिसरातील धूळघाट रोड, दाबिदा, झिल्पी, खापरखेडा या गावांनाही सौम्य धक्‍के बसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. जीवितहानी व वित्तहानी झालेली नसली, तरी कुडाच्या काही घरांची पडझड झाली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीचे नुकसान झाले.
धक्‍क्‍यांची तीव्रता मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही. तापी खोरे विकास महामंडळाकडून काही वर्षांपूर्वी भूकंपमापन केंद्र उभारण्यात आले होते; मात्र ते बंद असल्याने रिश्‍टर स्केलवर या धक्‍क्‍यांची नोंद होऊ शकली नाही. रविवारी (ता. 19) साद्राबाडीला अशाच प्रकारचे सौम्य धक्के बसले होते. बुधवारी पहाटे 2 वाजून 35 मिनिटांनीसुद्धा पुन्हा सौम्य धक्का जाणवला. तहसीलदार ए. टी. गाजरे यांनी या धक्‍क्‍यांच्या घटनेला दुजोरा दिला.

Web Title: earthqueue news

टॅग्स