उमरेडच्या रस्त्यांना खड्‌डयांचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

उमरेड/कुही : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून मतदारसंघातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. ग्रामीण भागातील शहरांना जोडणारे अनेक वर्दळीचे मार्ग खड्ड्यांनी ग्रस्त झालेले पाहायला मिळतात. 
कुही तालुक्‍यातील डोंगरमौदा-चिकना मार्गाची दुर्दशा झालेली दीर्घकाळापासून निदर्शनास येते. मांढळवरून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरमौदा येथून चिकना गावाला जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे भगदाड पडले असून अपघाताला आमंत्रित करीत असल्याचे दिसून येते. 

परिसरातील जनता याच मार्गाने मांढळ व उमरेडला विविध महत्त्वाच्या कार्यासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. नोकरदार, व्यावसायिक, मजूर, ग्रामीण भागातील शहरात शिकणारे शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी तर नादुरुत रस्त्यांचे बांधकाम करून आमचे जीवन सुरळीत करावे यासाठी सभोवताल स्थित असणाऱ्या दहेगाव, वडेगाव, डोंगरमौदा, चिकना-धमणा, टोला, ठाणा, हरदोली या गावांमधील नागरिकांची मागणी आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रॅक्‍टरची जड वाहतूक होत असते. उमरेड तालुक्‍यातील वीटभट्टीवरील पक्का मालाची मोठ्या प्रमाणात मागणी कुही तालुक्‍यात होत असल्यामुळे रस्त्यांची झीज झाल्याचे गावकरी सांगतात.  याशिवाय मांढळ येथील दलित वस्तीतील कच्चे रस्ते खड्‌डेमय झाले असल्यामुळे स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. याच मार्गाने नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, पेट्रोलपंप जाणारा एकमेव मार्ग असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. अनेकदा दुचाकीस्वार अपघात होऊन पडतात. त्यांना दुखापत झाल्याचे नागरिक सांगतात. अनेकदा जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रारींचे अर्ज सादर केलेत, परंतु त्यांचे दुर्लक्ष झाले. सध्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे आचारसंहिता लागू आहे. ती संपताच आंदोलन सुरू करू, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. 
ग्रामपंचायत , जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते विकासाच्या कामात पूर्वनियोजन केले नसल्यामुळे विकासकामांच्या निधीसाठी तरतूद केली नसल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले. त्याचा विपरीत परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. 
राजानंद कावळे 
सामाजिक कार्यकर्ते 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eclipse eclipses the roads of Umred