सुपर स्पेशालिटीत ‘ईको’ यंत्र बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘इको’ मशीन बंद पडली आहे. हृदयरोग विभागात ईसीजी झाल्यानंतर हृदयात त्रास असल्याचे दिसून येते. यानंतर ईको ही चाचणी महत्त्वाची ठरते. परंतु, ईको यंत्र बंद असल्याचा फटका रुग्णांना बसत आहे. हृदयरोग ग्रस्तांसाठी सुपर हे वरदान ठरत आहे.

मात्र, तांत्रिक कारणामुळे मशीन बंद असल्याने हृदयरोगग्रस्तांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.  

सुपर स्पेशालिटीत मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणासह इतरही राज्यांतील रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांमध्ये हृदयरोगग्रस्तांची संख्या अधिक असते. इको मशीन बंद असल्याने दूरवरून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. 

सुपरच्या हृदयशल्यचिकित्सा विभागात दररोज सुमारे २५ एन्जिओग्राफी होतात. एन्जिओग्राफीपूर्वी हृदयाशी संबंधित आजारासाठी ‘ईको’ चाचणी करावी लागते. अशा परिस्थितीत मशीन बंद असल्याने शस्त्रक्रियांची गरज असलेल्या रुग्णांना हाल सहन करावे लागत आहे. 

फिलिप्स कंपनीचे हे यंत्र आहे. या कंपनीला मशीन बंद असल्याची माहिती देण्यात आली असून ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचनाही सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मधुकर परचंड यांनी दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनाही यासंदर्भात पत्र दिले आहे. 

ईको मशीन बंद असल्याची माहिती मिळताच कंपनी आणि संचालकांना मेल केला. तसेच पत्राच्या माध्यमातून कळविण्यात आले. रुग्णांची गैरसोय टाळावी यासाठी मशीन लवकरात-लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. मधुकर परचंड, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी.

Web Title: eco machine close in super speciality