भ्रष्टाचार, काळ्या पैशाचा निर्देशांक कमी होईल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

अमरावती - देशाला डिजिटल इकॉनॉमीकडे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा निर्देशांक कमी होण्यास मदत होईल, असे मत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

अमरावती - देशाला डिजिटल इकॉनॉमीकडे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा निर्देशांक कमी होण्यास मदत होईल, असे मत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

बोकील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात मोठा बदल घडून येणार आहे. काही दिवस याचा त्रास सामान्य जनतेला होणारच. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांनी 50 दिवसांचा कालावधी मागितला आहे. या 50 दिवसांची नागरिकांना प्रतीक्षा करावी लागेल. परंतु, त्यानंतर देशात जो बदल घडेल, तो नक्कीच चांगला राहील. सरकारचा प्रतिनिधी म्हणून नव्हे; तर मीही सामान्य जनतेचाच सदस्य आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार, काळा पैसा, अमली पदार्थांची तस्करी, देहव्यापार व हवाला या सर्वांवरच मोठा परिणाम झाला, त्याचा फायदा नक्कीच देशाच्या विकासासाठी होईल. 

केंद्र सरकार ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. देशाची लोकसंख्या 130 कोटींच्या वर आहे. देशातील 70 टक्के लोकांना मोठ्या चलनाच्या नोटांची गरजच नाही. छोट्या चलनावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो, असेही ते म्हणाले. 

शंभर रुपयांचा साठा मुबलक असावा 
कमी चलनाची नोट असली की भ्रष्टाचार कमी प्रमाणात होतो. भ्रष्टाचार एकदम बंद होणार नाही; पण नोटाबंदीमुळे निश्‍चितच भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होईल. यासाठी शंभरच्या नोटेचा मुबलक साठा असणे गरजेचे आहे; किंबहुना सरकारने तो पुरवायला हवा.

Web Title: Economist anil bokil press conference