20 लाखांचे खाद्यतेल जप्त; "एफडीए'ची कारवाई

20 लाखांचे खाद्यतेल जप्त; "एफडीए'ची कारवाई

नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पथकाने शहरातील तीन तेल कंपन्यांवर छापा टाकला. यात 20 लाखांचे तेल जप्त करण्यात आले. हे तेल बनावट असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. 
मे. दीक्षिता ट्रेडिंग कंपनी, आनंद संतोष केशरवानी, मे. जेठानंद कंपनी अशी या कंपन्यांची नावे आहेत. एफडीएला या कंपन्यांच्या खाद्यतेलाच्या दर्जाबाबत तक्रारी मिळाल्या होत्या. तेलामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्‍यात असल्याचे बघत विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत पाटील यांनी स्वत: इतर अधिकाऱ्यांच्या मदतीने आंबेडकर चौकातील दीक्षिता ट्रेडिंग कंपनीसह आनंद संतोष केशरवानी यांचा टॅंकर व इतर एका कंपनीवर छापा टाकला. या तिन्ही ठिकाणी अस्वच्छतेसह बऱ्यांच नियमांचा भंग असल्याचे पुढे आले. या कारवाईमुळे तेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 
तीनही कंपन्यांचे तेलाचे नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. या नमुन्याच्या अहवालानंतरच संबंधित व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार आहे. हे सर्व 20 लाख रुपयांचे तेल एफडीएने स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या तेलात 20 हजार 270 किलो तेल दीक्षिता ट्रेडिंग कंपनीचे, 1 हजार 78 किलो तेल आनंद केशरवानी यांच्या टॅंकरमधले तर 2 हजार 740 किलो तेल जेठानंद कंपनीच्या मालकीचे आहे. ही कारवाई सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वात अभय देशपांडे, अनंत चौधरी, मनोज तिवारी, स्मिता बाभरे, महेश चहांदे यांनी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com