रमजान ईदच्या पर्वावर कबड्डी खेळाडूंनी केले रक्तदान

educated youth participated in blood donation camp
educated youth participated in blood donation camp

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : कुणी पदवीपर्यंत शिकलेले तर काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे. काही रोजीरोटी करणारे गोंडपिपरीतील तरुण. साऱ्यांनाच कबड्डीचा छंद. देशात टाळेबंदी लागली आणि घरी बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. या संकटकाळात आपणही समाजासाठी काहीतरी करायला हवे याचा विचार त्यांच्या मनात आला. मग काय या कबड्डीप्रेमींनी ईदच्या पर्वावर रक्तदान शिबिर घेतले. 46 डिग्री सेल्सिअस तापमानात सहा महिलांसह एकूण 83 लोकांनी रक्तदान करीत दायित्वाचा परिचय दिला.

कोरोनाने संपूर्ण जगाला हादरविले. कोरोनाबाधीतांचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपली आरोग्य यंत्रणा, पोलिस गेल्या दोन महिन्यांपासून रात्रंदिवस एक करताहेत. समाजातील सहृदयी या कठीण काळात मदतीचा हात देत आहेत. कुणी प्रशासनाला आर्थिक मदत करीत आहेत. कुणी गरीब, गरजूंच्या जेवणाची सोय करीत आहेत. गोंडपिपरीतील कबड्डी खेळणाऱ्या तरुणांनी केलेले एक सामाजिक काम सध्या कौतुकास पात्र ठरले आहे.

गोंडपिपरीतील हे तरुण. कुणी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले, तर काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अन्‌ काही रोजीरोटी करून आपल्या कुटुंबीयांना मदत करणारे. ही मुल रोज कबड्डी खेळायचे. यातूनच त्यांनी मंडळाची स्थापना केली. त्यातून कबड्डी स्पर्धा घेतल्या जायच्या. अशातच कोरोनाचे सावट आले. त्यामुळे घरी बसण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय उरला नाही. या संकटकाळात आपणही मदतीचा हात द्यावा, यासाठी त्यांनी नियोजन केले. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी ईदचा दिवस निवडला. सध्या चंद्रपुरात उष्णतेचा भडका उडाला आहे. तापमान 46 अंश सेल्सिअसवर गेले आहे. यामुळे अशावेळी कुणी रक्तदान करणार का, हा मोठा प्रश्‍न होता. पण सहा महिलांसह तब्बल 83 लोकांनी रक्तदान करीत दायित्व जोपासले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सरकारपुढे मोठे संकट आहे. रक्ताची मोठी गरज भासणार आहे. अशात कबड्डी खेळणाऱ्या, कट्ट्यावर चर्चा रंगाविणाऱ्या तरुणांनी राबविलेल्या या उपक्रमाची दखल घेत गावकरी त्यांचे कौतुक करीत आहेत. चेतन यशवंतवार, रोहित पुण्यप्रेड्डीवार, प्रवीण ताडशेट्टीवार, प्रज्ज्वल घोड़ाम नागेश धुड़से, रितेश पौनीकर, गौरव झाड़े, बालू बच्चूवार आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या पुढाकारातून एक सामाजिक कार्य पार पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com