महिला उद्योजिका घडविण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही यावेळी लावण्यात आले होते. यात महिला उद्योजिका म्हणून उत्कृष्टपणे भूमिका पार पडली.

रामटेक, (जि. नागपूर ): कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाद्वारा संचालित "ऑऊट रीच प्रोग्राम'अंतर्गत 25 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत रामटेक येथे महिला, मुलींसाठी कागदी पिशव्या, लिफाफे, कापडी पिशव्या, पायपुसणे व पर्स बनविणे आदीचे नि:शुल्क प्रशिक्षण संपन्न झाले. यातून महिला उद्योजिका घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

प्रशिक्षणादरम्यान कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांनी भेट दिली व महिलांशी संवाद साधला. यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेख अधिकारी डॉ. रामचंद्र जोशी यांनी महिलांना उद्योगासाठी बॅंकांकडून अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत माहिती दिली. नि:शुल्क प्रशिक्षणात एकूण 75 महिला सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमाला कुलसचिव विजयकुमार, परीक्षा नियंत्रक शिवहारे, नॅक समितीच्या संचालिका डॉ. कविता होले, संचालिका डॉ. ललित चंद्रात्रे, वसंत डामरे, प्राचार्य दीपक गिरधर, डॉ. ऋषिकेश दलाई, सुमित कठाडे उपस्थित होते. प्रशिक्षण कविता खडके यांनी दिले. प्रशिक्षणार्थींचे प्रतिनिधी स्मिता पडोळे व विमल मडावी यांनी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू वरखेडी यांचे आभार मानले. 

महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही यावेळी लावण्यात आले होते. यात महिला उद्योजिका म्हणून उत्कृष्टपणे भूमिका पार पडली. विश्वविद्यालयाचे अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी वस्तू खरेदी केल्या. संचालन योगिता गायकवाड, आभार दीपक गिरधर मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efforts to make women entrepreneurs