भंडारा - पवनी तालुक्यात ईद-उल-फित्र साजरी

शाहिद अली
शनिवार, 16 जून 2018

पवनी (भंडारा) : मागील महिनाभर खडतर (रोज़ा) उपवास केल्यानंतर आज शनिवारी मुस्लीम बांधवांनी मोठ्य़ा उत्साहात रमजान ईद साजरी केली. एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या. तालुक्यातील पवनी, अड्याल व कोंडा येथील ईदगाहात नमाजाचे सामूहिक पठण करण्यात आले. सकाळी मोठ्यां पासून लहान मुलानी सुद्धा  नवीन कपडे घालून नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम बांधवांनी ईदगाह येथे पहोचले होते. जगाला शांततेचा संदेश देणारा हा सण मुस्लीम बांधवानी उत्साहात साजरा केला.

शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शनानंतर सर्व मशिदी व प्रार्थनास्थळांमधून शनिवारी  ईद साजरी करण्याचे फर्मान निघाले आणि ईदच्या तयारीने एकच वेग घेतला होता. मध्यरात्रीपर्यंत तयारी करण्यात आली. महिलावर्ग मेहंदी काढून ईदच्या पार्श्वभूमीवर सज्ज होत होता. यानिमित्त शुक्रवार पर्यंत  शहरातील कपडे खरीदी सुरू होत्या. पहाटेपासून सणाच्या तयारीला वेग आला होता. घरची साफसफाई करून मुस्लीम बांधव सामुदायिक नमाजसाठी बाहेर पडत होते. सकाळी 9.30 वाजता पवनी येथील ईदगाह येथे  नमाज पठणाच्या ठिकाणांवर मुस्लीम बांधव दाखल होत होते. काजीपुरा इमाम यांनी नमाज पठण केले आणि देशाच्या शांतेता व राक्षणासाठी दुवा करण्यात आली.शहरातील ज़ामा मस्जिद येथे सुद्धा 9.30 वाजता हाफ़िज़ शौकत यांनी नमाज़ पठन केले।

तर कोंडा, अड्याल येथे मस्जिदचे इमाम यानी ईदगाह येथे नामाज पठण केले बहुतेक मुस्लिम बांधव ईदगाह येथे नामाज अदा करतात त्यामुळे हिंदू बांधवसुद्धा मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह येथे एकत्र आले होते. शिरखुरमा पेय रमजान ईद चा मुख्य पदार्थ आहे यामुळे प्रत्येक मुस्लीम घरात या पदार्थांची चलती असते. यंदाही मेजवान्यांची रंगत आणि एकमेकाला आलिंगन करुण हा सण साजरा होत होता. प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही सोशल मीडियावर ईदच्या शुभेच्छांची खैरात करण्यात येत होती. काही मंडळी तर आवर्जुन अनेकांच्या घरी जावून शुभेच्छा देण्यावर भर देत होते.

पवनी इदगा मैदान येथे सकाळी नमाज पठणासाठी गर्दी झाली होती. नमाज पठण करून खैरात वाटणे तसेच ईदच्या शुभेच्छा सुरु होत्या. या वेळी माज़ी आमदार बंडू सवरबंधे, नगरपरिषद उपद्यश कमलाकर रायपुरकर, प्रकाश पचारे, विलास काटेखाये, पुलिस उपविभागीय अधिकारी तिकस, पुलिस निरीक्षक, भागवत आकरे यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या. लहान मुलांना ईदी देण्यात आली.

Web Title: eid celebrates in pawani tehsil bhandara