Corona Breaking : विदर्भातील या जिल्ह्यात एकाच दिवशी  आठ रुग्ण आढळले पॉझिटिव्ह

corona positive
corona positive

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी सात जण दुसऱ्या राज्यातील असून एक जण यवतमाळ जिल्ह्यातील असल्याची माहिती, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली आहे. 

पॉझिटिव्ह असलेल्या आठ जणांपैकी चार जण उत्तर प्रदेशचे, दोन पश्‍चिम बंगालचे, तर एक दिल्लीचा आहे. ते सातही जण तबलिगी जमातच्या निझामुद्दीन मरगझमधून आलेले होते; तर, आठवा व्यक्ती हा त्या सात जणांच्या संपर्कात आला होता. 


येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात सध्या एकूण 65 जण भरती आहेत. त्यापैकी 51 जणांचे रिपोर्ट महाविद्यालयाला प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या रिपोर्टपैकी 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 14 जणांचे रिपोर्ट अजून प्राप्त झाले नाहीत. 

सात जण मरकझशी संबंधित
यवतमाळ जिल्ह्यातील जी व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे, त्याच्या घराशेजारील भाग सील (प्रतिबंधित) करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या घरातील इतर कुटुंबीय, तसेच सर्व पॉझिटिव्ह व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आले असतील असे त्यांचे नातेवाईक व इतर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनासुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दिली आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात आजच्या तारखेत 89 नागरिक असल्याचीही माहिती सिंह यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com