esakal | आईला शिळी पोळी का वाढली म्हणून मोठ्या भावाने केला धाकट्या बहिणीचा खून 
sakal

बोलून बातमी शोधा

rakshabandhan

आई शिळी पोळी जेवत असल्याचे बघून प्रकाशने तिला विचारले. त्यावर बहीण मनोरमाने, तुला काय करावे लागते, असे भाऊ प्रकाशला म्हटले. त्यामुळे चिडलेल्या प्रकाशने बहीण मनोरमाला मारहाण केली.

आईला शिळी पोळी का वाढली म्हणून मोठ्या भावाने केला धाकट्या बहिणीचा खून 

sakal_logo
By
संतोष तापकिरे

अमरावती : भावा-बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा भाऊबिजेचा सण नुकताच पार पडला. आपल्या भावाने आपले रक्षण करावे, संकट समयी धावून यावे म्हणून बहीण भावाच्या हाताला राखी बांधते. अशा या पवित्र सणाला दहा दिवस होत नाही तोच एका मोठ्या भावाने आपल्या धाकट्या बहिणीचे रक्षण करण्याऐवजी एका क्षुल्लकच्या कारणावरून तिचा खून केला. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील भातकुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम चाकूर येथे शुक्रवारी, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. 

मनोरमा देवराव बांगरे (वय २६, रा.चाकूर) असे मृत बहिणीचे तर प्रकाश देवराव बांगरे (वय ३९) असे आरोपी भावाचे नाव आहे. भाऊ प्रकाश बांगरे हा विवाहित असून तो वेगळा राहतो. शुक्रवारी सकाळी प्रकाश लहान भाऊ राहुल देवराव बांगरे (वय २८) याच्या घरी गेला. यावेळी त्याची आई जेवण करीत होती.

अवश्य वाचा- अरे वाह! चंद्रपूरच्या बहिणीने थेट पंतप्रधानांना पाठविली ही खास भेट....
 

आई शिळी पोळी जेवत असल्याचे बघून प्रकाशने तिला विचारले. त्यावर बहीण मनोरमाने, तुला काय करावे लागते, असे भाऊ प्रकाशला म्हटले. त्यामुळे चिडलेल्या प्रकाशने बहीण मनोरमाला मारहाण केली. मारहाणीच्या भीतीने मनोरमा पळत घराबाहेर पडली. यावेळी प्रकाशने घराबाहेर तिच्यावर विळ्याने हल्ला चढविला. यामध्ये मनोरमाचा जागीच मृत्यू झाला.

अवश्य वाचा- अभिमानास्पद! विदर्भातील तब्बल २१ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर...   
ही बाब लहान भाऊ राहुल याच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने भातकुली पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. राहुलच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोठा भाऊ प्रकाशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर

loading image