मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

संदीप रायपुरे
सोमवार, 16 एप्रिल 2018

गोंडपिपरी (चंद्रपूर) - चार दिवसापुर्वी मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना चंद्पूर जिल्हातील गोंडपिपरी तालूक्यातील हिवरा गावात समोर आली होती. दुर्घटना असल्याचा बनाव केल्याचे आता समोर आले असून, ही मोठ्या भावानेच लहान भावाला मारल्याचे समोर आले आहे. 

आनंदराव मशाखेत्री असे मृत्यू झालेल्या लहान भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आरोपी खुशालराव मशाखेत्री (मोठा भाऊ) व त्याची पत्नी अर्चना विरोधात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख करित असल्याची माहिती धाबा पोलिस ठाण्याचे ठाणेदार जिवन लाकडे यांनी दिली.

आंतरजातीय विवाह केलेल्या नातेवाइकाच्या कार्यक्रमात खुशालराव आपल्या कुटूंबियासह आनंदरावांच्या मुलीला घेऊन गेला होता. ''दुसऱ्या समाजातील तरूणासोबत विवाह करणाऱ्याच्या कार्यक्रमाला माझ्या मुलीला का नेले''? यावरून दोन्ही भावात वाद झाला. दरम्यान, रागच्या खुशालराव याने आनंदरावच्या डोक्यावर उभारीने वार केले.
 यात तो गंभीर जखमी झाला. चंद्रपूरात उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. 

या घटनेची चर्चा तालूक्यात जोर धरू लागल्यानंतर  आरोपीच्या पत्नीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच आनंदराव मांडवावरून कोसळ्याल्यामुळे त्याचा मृत्यू खुशालराव आणि अर्चना यांनी बनाव केला. यानंतर पोलिस तपासात ही हत्या असल्याचे समोर आले. 

Web Title: The elder brother killed a little brother