esakal | चंद्रपूर : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार; झोपेतच नेले फरफटत
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार; झोपेतच नेले फरफटत

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार; झोपेतच नेले फरफटत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावली (जि. चंद्रपूर) : झोपेत असलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केला. नरडीला पकडून घराबाहेर फरफटत नेत ठार केले. ही घटना मंगळवारी (ता. १३) रात्री दहा वाजता व्याहाड बूज येथे घडली. मृत महिलेचे नाव गंगूबाई रामदास गेडाम (वय ६१) असे आहे. (Elderly-woman-killed-in-leopard-attack)

सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत व्याहाड बूज गाव येते. जंगलाला लागूनच हे गाव आहे. त्यामुळे गावाशेजारी नेहमी वाघ, बिबट्याचा वावर असते. मंगळवारी गंगूबाई रामदास गेडाम या जेवण करून झोपल्या. तेव्हाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. वृद्ध महिलेच्या नरडीला पकडून फरफटत घराबाहेर नेले. तिथेच तिला ठार केले.

हेही वाचा: दवाखान्यात गेली अन् गर्भवती निघाली; पालक पडले संभ्रमात

या घटनेची माहिती रात्री गावात फिरत असलेल्या काही युवकांना मिळाली. त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळ आले. त्यांनी पंचनामा केला. मृत महिलेचे शव उत्तरीय तपासणीसाठी सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

(Elderly-woman-killed-in-leopard-attack)

loading image