
अमरावती : कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुका आता पुन्हा होणार आहेत. सहकार विभागाकडून मंगळवारी (ता.दोन) याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असून निवडणुकीचे वेळापत्रकसुद्धा तयार करण्यात येणार आहे.
13 मार्च 2020 ला कोरोनाच्या आपत्तीमुळे पहिल्यांदा सहकारी संस्थांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. पुढे 17 जूनला मुदत संपलेल्या सहकारी संस्थांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यानंतर जानेवारीमध्ये पुन्हा निवडणुकीचा अध्यादेश जारी करण्यात आला. मात्र, सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश शासनाने दिले. राज्यात विधानपरिषद तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. मात्र, सहकारी संस्थांच्याच निवडणुका का घेण्यात येत नाहीत?, अशा तक्रारी या क्षेत्रातील मंडळींकडून करण्यात येत होत्या. त्याची दखल घेत पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश सहकार विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार आता वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली होती, त्याच टप्प्यापासून पुन्हा ही प्रक्रिया घेतली जाणार आहे.
शासनाकडून मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम तयार करून तो मंजुरीसाठी सहकार विभागाकडे पाठविण्यात येईल.
- संदीप जाधव, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.