निवडणूक आयोगासह खा. नेते, मेंढे यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नागपूर  : विजयी खासदारांविरुद्ध दाखल याचिकांवर मंगळवारी (ता. 23) नागपूर खंडपीठाने मुख्य निवडणूक आयोग, खासदार अशोक नेते व खासदार सुनील मेंढे यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने प्रतिवादींना चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.

विदर्भातील सात पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या खासदारांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान दिले आहे. निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपचे गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते व भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे, कारू नान्हे यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकांवर न्या. रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. बुधवारी (ता. 24) काही निवडणूक याचिकांवर न्या. झेड ए हक व न्या. मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणीची शक्‍यता आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. निहालसिंग राठोड, निवडणूक आयोगातर्फे ऍड. नीरजा चौबे, भंडारा व गडचिरोली निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे मुख्य सरकारी वकील सुमंत देवपुजारी यांनी बाजू मांडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission, Notice to the leader