Maharahstra vidhansabha 2019 "बाहेरचा उमेदवार लादू नका'

रामटेक : "भूमिपुत्र कॉंग्रेस' मेळाव्यात स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्ते.
रामटेक : "भूमिपुत्र कॉंग्रेस' मेळाव्यात स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्ते.

रामटेक  : गेली 32 वर्षे रामटेक विधानसभेवर उमेदवार आयात करण्यात येत असल्याने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी हजारो कार्यकर्त्यांनी "भूमिपुत्र कॉंग्रेस'च्या मंचावरून केली. कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी स्थानिकच्या मुद्द्यावर तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने पक्षाचे वरिष्ठ नेते यावर कोणती भूमिका घेतात. याकडे आता लक्ष लागले आहे.
रामटेक येथील देशमुख सेलिब्रेशन लॉनमध्ये "भूमिपुत्र कॉंग्रेस'च्या बॅनरखाली कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी "स्थानिक उमेदवार' मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी विधानसभाक्षेत्रातील कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची हाक दिली होती. रामटेक विधानसभाक्षेत्राने तब्बल 32 वर्षांपासून कॉंग्रेसला रोखून धरले. यादरम्यान जनता दल, शिवसेना व भाजपच्या आमदारांनी या क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले. कॉंग्रेसने प्रत्येक वेळी बाहेरून उमेदवार लादल्याने कॉंग्रेस विजयापासून दूर आहे. यावेळी बाहेरचा उमेदवार लादला जाऊ नये म्हणून सचिन किरपान, उदयसिंग (गज्जू) यादव, सुरेश कुंमरे आणि चंद्रपाल चौकसे या इच्छुकांनी "भूमिपुत्र कॉंग्रेस' या बॅनरखाली विधानसभाक्षेत्रातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.
मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते स्थानिकांच्या मुद्द्यासाठी एकवटले. यावेळी राष्ट्रवादीचे किशोर बेलसरे, कन्हान पालिकेतील विरोधी पक्षनेते नरेश बर्वे, मत्स्यविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक बर्वे, शांता कुमरे, सुरेश भोयर, नगरसेवक दामोधर धोपटे, डॉ. रामसिंग सहारे, दुधराम सव्वालाखे, इसराईल शेख, भाऊ राहाटे, माजी आमदार एस. क्‍यू. जामा, अशोक झाडे उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने स्थानिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. संचालन सुनील रावत यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com