Election Results : भाजप-शिवसेना युतीचे सुनील मेंढे विजयी

सुनील मेंढे
सुनील मेंढे

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून भाजप, शिवसेना, रिपाइं युतीचे उमेदवार सुनील बाबुराव मेंढे विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.
सकाळी मतमोजणी सुरू होताच पहिल्या फेरीपासून सुनील मेंढे यांनी आघाडी घेतली. शेवटच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम होती. विजयानंतर शहरातून रॅली काढून जल्लोष करण्यात आला. या रॅलीत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील आमदार आदी उपस्थित होते.
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मधुकर कुकडे यांनी पराभव केला होता. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची जागा खेचून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. यात भाजपला यश मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com